वॉर अगेन्स्ट व्हायरस असल्याने रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊन नका!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोना व्हायरसचा संसर्गाची प्रकरण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून संबोधन केलं. आपण एका विषाणू सोबत जागतिक युद्ध लढत आहोत तेव्हा एकजुटीनं लढण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा, सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नका, सरकारने दिलेल्या सूचना पाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

करोना व्हायरस हे वेगळ्या प्रकारचं युद्ध आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचना पाळा. घरातच राहा, गर्दी टाळा. स्वत:हून काही बंधने पाळा, असं सांगतानाच हे वॉर अगेन्स्ट व्हायरस असल्याने रेल्वे, बसेस बंद करण्याची वेळ येऊ देऊन नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

राज्य सरकारकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या आवाहनाला लोकांकडून प्रतिसाद मिळाला आहे. पण, अजून गर्दी कमी करण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणा करोनाविरोधात सक्षम आहेत. फक्त नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं. ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य द्यावं. लोकल, बस सेवेतील ताण कमी करावा, जेणेकरून आपल्याला करोनावर मात करता येईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Udhhav Thackeray Press Conference on Coronavirus Outbreak

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment