नवी दिल्ली । केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सरकारला आम्ही २ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. सरकारने तोपर्यंत कायदे मागे घेतले नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.
जोपर्यंत तिन्ही कृषी कायदे रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही येत्या २ ऑक्टोबरपर्यंत गाझीपूर सीमेवर आंदोलन सुरूच ठेवू, असं टिकैत म्हणाले. राकेश टिकैत यांनी आंदोलन दिर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी एक फॉर्म्युला दिला होता. आंदोलन करणाऱ्या शेतकर्यांनी प्रत्येक गावातून एक ट्रॅक्टर, १५ समर्थक आणि १० दिवसांच्या फॉर्म्युलावर काम करावं, असं टिकैत यांनी सांगितलं होतं. मग आंदोलन ७० वर्षे का चालेना काही हरकत नाही, असं ते म्हणाले.
We have given time to the government till 2nd October to repeal the laws. After this, we will do further planning. We won't hold discussions with the government under pressure: Rakesh Tikait, Bharatiya Kisan Union pic.twitter.com/HwqBYDIH5C
— ANI (@ANI) February 6, 2021
उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी २ महिन्यांहून अधिक काळापासून गाझीपूर सीमेवर आंदोलन करत आहेत. गाझीपूर सीमेवर भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.