प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली. गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ … Read more

‘तोच भावुकपणा मोदींनी शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल’; अजितदादांचा खोचक सल्ला

नाशिक । काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ कल संपला. यावेळी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावुक झाले होते. राज्यसभेत आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले होते. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे. जी भावुकता संसदेत दाखवली तीच भावुकता शेतकऱ्यांच्या … Read more

संजय राऊतांचा सणसणीत टोला; संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत..

नवी दिल्ली । दिल्लीत गेल्या ७५ दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. “शेतकऱ्यांसाठी कोणाच्याही डोळ्यात अश्रू येत नाही. संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत, पण त्याच्यावर सर्वजण मौन बाळगून आहेत आणि त्या आंदोलनाची चेष्टा आणि थट्टा करताहेत, ते नौटंकी आहे असं म्हणताहेत. … Read more

सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, MSP वर केली 18% अधिक धान्य खरेदी, कोणत्या राज्याचा सर्वात जास्त फायदा झाला हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । तीन नवीन कृषी विपणन सुधारणा (Agri Marketing Reform laws) कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या विविध सीमांवर शेतकर्‍यांकडून सुरू असलेल्या निषेधाच्या वेळी चालू विपणन हंगामात (Kharif Marketing Season) आतापर्यंत 1.16 लाख कोटी रूपयांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) धान्याची खरेदी 18 टक्क्यांनी वाढून 614.25 लाख टन झाली आहे. चालू खरीप मार्केटिंग सेशन (KMS) 2020-21 मध्ये मागील … Read more

राकेश टिकैत यांचे मोदी सरकारला अल्टिमेटम ; शेतकरी आंदोलन २ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार

नवी दिल्ली । केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनातील नेते राकेश टिकैत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सरकारला आम्ही २ ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. सरकारने तोपर्यंत कायदे मागे घेतले नाही, तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. जोपर्यंत तिन्ही कृषी … Read more

रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा; काय आहे व्हायरल फोटोमागील सत्य ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या पॉप सिंगर रिहानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारं ट्विट केल्यापासून रिहानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे. व्हायरल फोटोमध्ये रिहानाच्या हातात पाकिस्तानचा झेंडा दिसत आहे. हा फोटो फेसबुक आणि ट्विटर दोन्ही प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. रिहानाचा … Read more

ब्रिटनच्या संसदेत शेतकरी चळवळीवर चर्चा करण्यासाठी 1 लाखांहून अधिक लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या

Farmers Protest

लंडन । ब्रिटिश संसदेची याचिका समिती भारतातील शेतकऱ्याचे आंदोलन आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या मुद्दय़ावर हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये चर्चा करण्याचा विचार करेल. या मुद्द्यांशी संबंधित ऑनलाइन याचिकेवरील 1,10,000 हून अधिक स्वाक्षर्‍या नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बोरिस जॉनसन यांनी पश्चिम लंडनमधील कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार म्हणून या याचिकेवर स्वाक्षरी केल्याचीही चर्चा आहे, परंतु पंतप्रधान कार्यालयाने हे … Read more

शेतकऱ्यांचे ६ फेब्रुवारीला ‘चक्का जाम’ आंदोलन; टिकैत यांनी केली ‘ही’ हटके घोषणा

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासंदर्भात शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्यावरही या प्रश्नी तोडगा निघालेला नाही. त्यामुळं कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलं आहे. येत्या ६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांकडून ३ … Read more

धमक्यांना घाबरत नाही, शेतकरी आंदोलनाला समर्थन सुरूच राहील; दिल्ली पोलिसांच्या FIR नंतर ग्रेटाचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली । स्वीडनची रहिवासी आणि ‘नोबल पुरस्कार’ विजेती १८ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी भावना भडकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईनंतर ग्रेटाने प्रत्युत्तरात एक ट्विट केलं आहे. माझ्यावर कोणत्याही धमकीचा काहीही फरक पडणार नाही. माझा शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील, असं ग्रेटाने म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांनी ग्रेटा थनबर्ग हिच्याविरोधात … Read more

मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले,”नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणार अनेक फायदे”

नवी दिल्ली । देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी सांगितले की, तीन नवीन शेतीच्या कायद्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सुब्रमण्यम म्हणाले, “आम्ही अर्थशास्त्रज्ञ आहोत आणि अर्थशास्त्राच्या गोष्टी सांगतो आणि अर्थशास्त्र म्हणते कि या कृषी कायद्याचे अनेक फायदे आहेत.” शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत विशेष म्हणजे नुकत्याच … Read more