एएनआय वृत्तसंस्था |
तीन तलाक विधेयकावर तुमच्या पक्षाची भूमिका काय असे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान याना आज विचारले असता, आमच्या पक्षाचा पाठिंबा जे कुराणमध्ये लिहिलंय त्यालाच आहे असं ते म्हणाले . झटपट दिल्या जाणाऱ्या तीन तालाकच्या प्रथेवर बंदी घालणार विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं या पार्श्वभूमीवर त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता.
या विधेयकाविषयी बोलताना आझम खान म्हणाले ‘कोणत्याही धर्माने इस्लाम धर्माएवढे स्त्रियांना अधिकार दिलेले नाहीत”. “पंधराशे वर्षांपूर्वी महिलांना सामान अधिकार देणारा इस्लाम हा पहिला धर्म आहे. त्यामुळे इस्लाममध्ये घटस्फोट, महिलांवरील अत्याचार कमी प्रमाणात आढळतो’.” इस्लाम मध्ये महिलांना जाळलं किंवा मारून टाकलं जात नाही.”
तीन तलाक हा राजकीय विषय नसून धार्मिक आहे. आणि मुस्लिमांसाठी कुराणच सर्वोच्च आहे. विवाह, घटस्फोट अशा प्रत्येक गोष्टीबाबत कुराणमध्ये स्पष्ट सूचना आहेत आणि आम्ही त्या पाळतो असही ते म्हणाले. मागच्यावेळी तीन तलाक विधेयक लोकसभेने पारित केलं होत. परंतु ते राज्यसभेत प्रलंबित असताना लोकसभा विसर्जित झाल्यामुळे रद्द झालं होत.