व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकडे प्रामुख्याने लक्ष देणार – गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

कोल्हापूरचे विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची गृहराज्यमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर पहिली प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांसमोर दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गेल्या टर्ममध्ये मी चार वर्षे मंत्री म्हणून होतो त्याचा अनुभव पाठीशी असल्याने आता गृहराज्यमंत्री म्हणून काम करणं अधिक सोपं होणार आहे.

त्यासोबतच राज्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राहणं आणि सायबर हल्ले गुन्हे रोखणे याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटल. दरम्यान सतेज मंत्रिपद मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. येत्या काळात सतेज पाटील मंत्री म्हणून चांगली कामगिरी बजावतील असा विश्वास पाटील यांच्या समर्थकांनी व्यक्त केला.