अजित दादांनी खबरदारी घ्यावी : आ. शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
एकनाथ शिंदे साहेब एक स्वाभिमानी नेते आहेत. त्याच्यासोबत 40 आमदार, 12 खासदार 14 राज्यातील राज्यप्रमुख, राज्यातील बहुतांशी जिल्हा प्रमुख सोबत आहेत. त्यामुळे आमच्या उठावाला, कृतीला अजित दादा बेईमानी हा शब्द वापरत आहेत, तो पूर्णपणे चुकीचा आहे. दादांची काम करण्याची सडेतोड कामाची पध्दत आहे. परंतु या पध्दतीमुळे कोणाच्या भावना दुखावणार नाहीत. शिंदे साहेबांचे लाखो समर्थक आहेत, त्याच्या भावना दुखावणार नाहीत. आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांच्याविषयी वक्तव्ये सहन करणार नाही, तेव्हा अजित दादांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. याविषयी मरळी (ता. पाटण) येथे पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार दादा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक शब्दप्रयोग केला. ते म्हणाले, जिथे ते राहिले- वाढले तिथेच बेईमानी केली. त्यांनी मुख्यमंत्र्यावर नाहक अशी टीका केली आहे. शिंदे साहेबांचा समर्थक, चाहता म्हणून हे बोललेलं आम्हांला कुणालाही सहन झालेलं नाही. आम्ही आणि शिंदे साहेबांनी बेईमानी कधीच केलेली नाही. उलट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिदुत्वाचे विचार उध्दवजी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून हे विचाल लांब नेण्याचे काम केले. परंतु तेच विचार आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जपण्याचे काम केले आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/432270322418577

अजित दादांनी 2019 साली बेईमानी केली नव्हती का?
अजित दादा आम्ही बेईमानी केली असं म्हणत असतील तर पाठीमागे 2019 मध्ये तुम्ही 48 तासाच सरकार जे तुम्ही केलं होत. ती बेईमानी नव्हती का?. पहाटेचा शपथविधी करताना तुम्ही शरद पवार साहेबांची परवानगी घेतली होती का?. त्यांना विचारल होत का असा जर प्रश्न आम्ही तुम्हांला विचारल तर तुम्हांला आवडणार नाही, असा प्रतिहल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांच्यावर केला.