आम्ही भाजपपासून वेगळे झालो, हिंदुत्वापासून नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान पत्रकारांनी हिंदुत्वाबाबत विचारलेल्या एका प्रश्नांला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘आम्ही भाजपपासून वेगळे झालो आहोत, हिंदुत्वापासून नाही’ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. हिंदुत्व आणि भाजप या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, राम मंदिर होईल की नाही, ते कोण बनवेल याबाबत आधी चर्चा सुरु होती. तेव्हा शिवसेनेची मागणी होती की केंद्र सरकारने राम मंदिराच्या निर्मितीसाठी कायदा बनवावा, तो कायदा तर झाला नाही. मात्र, आता हा प्रश्न सुटला आहे. २०१८ मध्ये मी पहिल्यांदा इथं आलो होतो, त्यानंतर मी पुन्हा इथं येईल असं म्हटलं होतं. त्यामुळे आज पुन्हा अयोध्येत येणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment