Thursday, October 6, 2022

Buy now

बहुमत चाचणी मध्ये आमचाच विजय होईल- एकनाथ शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बहुमत चाचणी मध्ये आमचाच विजय होईल, महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासाठी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जातोय असं विधान बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केलं. आज शिंदे यांच्यासहित सर्व बंडखोर आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते

एकनाथ शिंदे म्हणाले, इथे आलेलं सर्व आमदार स्वखुशीने आलेत. त्यांच्या कडे बघितल्या वर असं वाटत का की ते जबरस्तीने आलेत ?? सर्वजण आनंदात आहेत असेही शिंदेनी स्पष्ट केलं. उद्याच्या बहुमत चाचणीत आमचाच विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्ही सर्वजण उद्या मुंबईत येणार आहोत. आमच्याकडे २ तृतीयांश पेक्षा जास्त आमदार आहेत. तब्बल ५० आमदार आमच्या सोबत असल्याने बहुमत चाचणीत आम्ही पास होऊ असं एकनाथ शिंदे म्हणाले

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हीच आमची शिवसेना आहे. हि हिंदुत्त्वाला पुढे घेऊन जाणारी शिवसेना आहे. हि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारणा पुढे घेऊन जाणारी शिवसेना आहे. महारष्ट्रातील जनतेला सुखी, समृद्धी ठेवण्यासाठी आणि हे राज्य सुजलाम सुफलाम करण्यासाठी, या राज्याचा विकास करण्यासाठी, महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासाठी आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जातोय असं एकनाथ शिंदे म्हणाले.