Weather Forecast | पुढील 3-4 तास धोक्याचे; मुंबईसह ‘या’ भागांना दिला अतिवृष्टीचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Forecast | मान्सूनने महाराष्ट्रात हजेरी लावलेली आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये रविवारी देखील जोरदार पाऊस पडला मुंबईतही मध्यरात्रीपर्यंत पाऊस चांगलाच कोसळला आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे.

Weather Forecast | हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या तीन ते चार तासांमध्ये महाराष्ट्रात चांगलाच पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार आहे. त्यामुळे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे आता हवामान खात्याने पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच अहमदनगर, नाशिक, जळगाव देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, नांदेड या ठिकाणी देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

काल रात्री मुंबईसह अनेक ठिकाणांना पावसाने झोडपून काढलेले आहे. रविवारी मध्यरात्रीपर्यंत परिसरात जोरदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सगळ्या भागात पाणी शिरल्याने वाहतुकीची देखील कोंडी झालेली होती. दादर सिटी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होतं.