Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. कोकणात तर अति मुसळधार पाऊस पडत आहे. त्यासोबतच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याची देखील सांगण्यात आलेले आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
कोकणातील शाळांना सुट्टी | Weather Update
8 जुलै 2024 रोजी मुंबई मधील सगळ्या शाळांना सुट्टी दिलेली होती. परंतु पावसाचा वेग काही ओसरला नाही. म्हणूनच आता आज म्हणजेच 9 जुलै 2024 रोजी मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. कारण नवी मुंबईमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याच्या उद्देशाने शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
हा आदेश नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी केलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि बारावीपर्यंतच्या कॉलेजला सुट्टी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात देखील शाळा आणि कॉलेज आज बंद राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आलेली आहे.
पुण्यात पावसाचा रेड अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 9जुलै रोजी पुण्यात अति मुसळधार पाऊस पडण्याचा शक्यता आहे. त्यामुळे त्यामुळे पुणे शहर, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी, भोर या तालुक्यातील बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. अतिवृष्टीमुळे काही अनुचित घटना घडू नये आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये. यासाठी शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या काळात नागरिकांनी देखील सावधानता बाळगावी, तसेच धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनाला जाऊ नये. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे.