Weather Update : एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यासोबत राज्यातील हवामानात देखील गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल झालेला पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट आलेली आहे. तर राज्यातील काही ठिकाणी मात्र अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे.
अशातच आता हवामान विभागाने या अवकाळी पावसाबद्दल अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी म्हणजेच आज 7 एप्रिल 2024 रोजी अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे पुढील 4 दिवस राज्यातील विविध ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता आपण पुढील 4 दिवस महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे हे पाहणार आहोत.
राज्यात या भागात येलो अलर्ट जारी : Weather Update
राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ यांसारख्या जिल्ह्यामध्ये आज म्हणजे 7 एप्रिल 2024 रोजी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी तुरळक पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा देखील अंदाज वर्तवला आहे. यासोबतच राज्यातील धुळे, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, अहमदनगर, नांदेड, लातूर, जळगाव या ठिकाणी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. या ठिकाणी त्यांनी येल्लो अलर्ट जारी केलेला आहे. गेले दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. आणि पुढील काही दिवस देखील या पावसाची शक्यता (Weather Update) वर्तवण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे हवामान विभागाने अकोल्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच नागपूर, यवतमाळ, गोंदिया या ठिकाणी देखील तुरळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी त्यांनी येलो जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील गारपिटीसह मुसळधार पाऊस (Rain) पडेल. या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.
या भागात असणार कडक ऊन
राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत असला, तरी दुसरीकडे आपल्याला कडक उन्हाच्या झळा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिसा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट येणार आहे. त्याचप्रमाणे झारखंड, तेलंगणा या ठिकाणी देखील तापमानात वाढ झालेली पाहायला मिळणार आहे. याबाबतचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
आयएमडीकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा
अगदी मार्च महिन्यापासूनच राज्य तापमान वाढीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवसात उकाडा वाढण्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवलेली आहे, तर राज्यामध्ये वातावरणाचा पारा 40° c वर जाण्याची शक्यता आहे.