Weather Update | नुकतेच मे महिन्याला सुरुवात झालेला आहे. राज्यामध्ये अगदी मार्च महिन्यापासूनच उन्हाचा कहर जाणवत होता. आजकाल हे तापमान वाढत चालले आहे. यापुढे तापमान वाढीमध्ये मोठा वाढ होणार, असल्याचे हवामान विभागाने व्यक्त केलेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता पुढील काही दिवस म्हणजे मे महिन्यामध्ये हे तापमान तसेच राहणार आहे. राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार आता पुढे काही दिवस म्हणजे मे महिन्यामध्ये हे तापमान तसेच राहणार आहे. 4 ते 6 मे दरम्यान उष्णतेची लाट कायम राहील असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी आणि सोलापूर या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. परंतु मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पाऊस येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात (Weather Update) आलेली आहे.
त्याचप्रमाणे वेधशाळेने देखील याबाबत अंदाज वर्तवला आहे. त्या अंदाजानुसार महाराष्ट्र आणि गोव्या या राज्यात 5 मे 2024 पर्यंत कोरडे हवामान राहील. 6 मे रोजी मराठवाडा त्याचप्रमाणे विदर्भात स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी पुढील पाच दिवस हवामान उष्ण आणि दमट असणार आहे.
त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर, सातारा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, विदर्भ, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये उष्णतेचे लाट आणि संध्याकाळी हलका स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 6 मे रोजी चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किलोमीटरवर वारे वाहू शकतात. पावसाची देखील शक्यता आहे.
मुंबईत होणार तापमान वाढ तर पुण्यात होणार तापमानाची घट | Weather Update
मुंबईमध्ये तापमानाचा पारा चांगलाच चढलेला आहे. या ठिकाणी उष्णतेची लाट कायम असणार आहे. पुढील काही दिवसात मुंबईचे तापमान हे 35°च्या पुढे जाण्याची देखील शक्यता आहे. परंतु पुणेकरांना याबाबत काहीसा दिलासा मिळणार आहे. पुढील 5 ते 7 दिवस तापमानात घट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये देखील 40°c व तापमानाचा पारा गेलेला आहे. परंतु पुढील काही दिवस तापमन कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने लावलेला आहे.