Weather Update | राज्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | गणपती नंतर महाराष्ट्रात पावसाने थोडासा आराम केल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचे वातावरण संपूर्ण राज्यभर पसरलेले आहे. काही ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात देखील झालेली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सर्वत्र पाहायला मिळत आहे. परंतु आज पासून पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळणार मिळालेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे विदर्भ मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान विभाग पावसाबद्दलचा अंदाज नेहमीच व्यक्त करत असतात. त्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात देखील पाऊस (Weather Update) पडणार आहे. विजांचा कडकडाटासह सोसाट्याचा वारा देखील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा येल्लो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. धाराशिव, लातूर, बीड, नांदेड यासह आजूबाजूच्या परिसरात आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे

परभणीत देखील अनेक दिवसानंतर पुन्हा एकदा पाऊस बरसलेला आहे. तसेच आजूबाजूच्या शहरांमध्ये एक तास मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. या पावसामध्ये वादळीवारा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होणार आहे. सध्या सोयाबीन पिकाचे काढण्याची सुरुवात होणार आहे. आणि त्या काळातच पावसाने जोरदार हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. परंतु जर सोयाबीन पीकाला पावसाचा मारा बसला, तर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःचे त्याचप्रमाणे पिकांचे रक्षण करावे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.