Weather Update | गेल्या 2 दिवसापासून पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. पुण्यापासून तर अगदी सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती देखील निर्माण झालेली आहे. अति मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे काल म्हणजेच 25 जुलै आणि आज 26 जुलै रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्ट्या देखील जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे शहरातील शाळांना देखील सर्वत्र आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
अशातच आज म्हणजे 26 जुलै रोजी देखील पावसाचा (Weather Update) अंदाज व्यक्त केलेला आहे. आज देखील पुण्यात अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे घाट माथ्यावर देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचप्रमाणे इतर अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
काही राज्यांमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देखील हवामान विभागाने जारी करण्यात आलेला आहे. त्यात रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. सातारातील घाट परिसरात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात देखील मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच इतर अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच आज 60 ते 70 किलोमीटर तासी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील आज मुसळधार त्यातील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आज अनेक ठिकाणी तुरळक आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे आता प्रशासनाने देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आव्हान दिलेले आहे. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याची देखील सांगितलेले आहे.