Weather Update | संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झालेली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सर्वत्र मान्सूनने हजेरी लावलेली आहे. हवामान विभाग रोज पावसाबद्दल अंदाज व्यक्त करत असतात. आज देखील हवामान विभागाकडून म्हणजेच 8 जुलै रोजी हवामान कसे असेल? याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
हवामान विभागाने (Weather Update) दिलेले माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अत्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे दिवसभर या ठिकाणी ढगाळ असे वातावरण असणार आहे. या ठिकाणी किमान 26 अंश सेल्सिअस आणि कमाल 30°c एवढे तापमान असणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी मेघगर्जना होण्याची देखील शक्यता आहे. तसेच कोकण गोव्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.
या ठिकाणी पावसासह (Weather Update) अनेक आणखी एक संकटाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. कारण कोकण गोव्यात पावसासोबत विजा देखील कडाडणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आज मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे.
त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. कारण या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुण्यातही आज मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या विभागाला ऑरेंज अलर्ट देखील जारी केलेला आहे. पुण्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे यामध्ये किमान तापमान 21°c ते कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढचे पाच दिवस पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागांना येल्लो अलर्ट देखील जारी केलेला आहे.