हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून हवामानात चढ उतार होताना दिसतायत. पण यंदाच्या वर्षी मात्र लोकांना वेगळाच अनुभव मिळत आहे. लोकांना उन्हाळाच्या दिवसात थंडी , गर्मी अन् ढगाळ वातावरण पाहण्यास मिळत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील वातावरणात होणारा बदल. फेब्रुवारीपासून एवढी गर्मी तर मे पर्यंत उष्णतेची काय स्थिती असेल , अशी चिंता लोकांना लागली आहे. पण काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे लोकांना नेमकं पुढील दिवसात वातावरण कस असणार असा प्रश्न पडत आहे . तर चला या महिन्यात हवामानाची नेमकी काय परिस्थिती असेल हे पाहुयात.
हवामान विभागाचा अंदाज (Weather Update) –
आता जर विदर्भ रत्नागिरी येथील तापमान पाहिल्यास अनुक्रमे ते 37 अंश , 36 अंश पोहचले आहे. म्हणजेच आता थंडी कमी झाली असून तिने परतीचा प्रवास सुरु केला आहे. त्याचसोबत वर्धा, अमरावती, वाशिम इथं तापमान 37 अंशांवर राहील. तर, राज्यातील किमान तापमान 19 अंशांदरम्यान राहणार अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे.
ढगाळ वातावरण चिंतेत भर टाकणार –
राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही ढगाळ वातावरण (Weather Update) चिंतेत भर टाकणार आहे , या दरम्यान उष्णता जाणवण्याचे प्रमाणही वाढू शकते असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये सुद्धा हवामानात बदल दिसून येणार आहे. आता काही ठिकाणी थंडी , धुक्याचा अनुभव मिळत आहे. तर काही ठिकाणी उष्णता .