Weather Update | सध्या बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ चालू आहे. आणि या फेंगल चक्रीवादाचा फटका तमिळनाडूसह इतर अनेक राज्यांना देखील बसत आहे. आणि आता या चक्रीवादळाचा कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे सरकताना दिसत आहे. त्यामुळे हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामाना विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. सध्या राज्यातील तापमान देखील कमी होताना दिसत आहे. आणि वातावरणात चांगलाच गारठा पसरलेला असून ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे 3 आणि 4 डिसेंबर दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देखील जारी केलेला आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या सरी बरसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता तळ कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून हा पाऊस पडणार आहे. 3 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिलेला, असून 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, सांगली आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा वायव्यकडे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असणारी ही कडाक्याची थंडी ओसरणार असून हा तापमान वाढणार असा आहे. हे फेंगल चक्रीवादळ हळूहळू आता पश्चिमेकडे सरकत आहे. आणि नंतर त्याची तीव्रता कमी होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम कोकणातही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. 3 ते 6 सप्टेंबर दरम्यान कोकणामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे हवामानात बदल होणार असून हवामान दमट होणार आहे. मागील दोन दिवसापासून हवामानात बदल झालेला आहे. तापमान आता वाढत असल्याने कोकणातील थंडी देखील गायब झालेली आहे.