हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशी गर्ल म्हणून ओळख असलेली प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अनेकांची सर्वात आवडती अभिनेत्री आहे. बॉलिवूडसोबतच प्रियानकाने हॉलीवूडमध्येही अभिनय केल्यानं तिला एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेत्री म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे. निक जोनास याच्यासोबत विवाह केल्यानंतर प्रियांका परदेशातच स्थायिक झाली आहे. नुकतेच प्रियांका अन निकने चाहत्यांना गुड न्यूजही दिली आहे. मात्र आता प्रियांकाच्या एका फोटोमुळे तिचे चाहते थोडे हैराण झाले आहेत.
https://www.instagram.com/p/CdrnsGEtKeV/?utm_source=ig_web_copy_link
प्रियांका चोप्राचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये प्रियांकाच्या तोंडाला जखम झाल्याचं दिसत आहे. प्रियांकाच्या चेहऱ्यावरील जखम पाहून तिचे चाहते हैराण झालेत. ओठ आणि नाकातून रक्त येत असल्याचं पाहून प्रियंकाला जबर मार लागल्याचं दिसत आहे. प्रियंकाने स्वतः हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. Priyanka Chopra
[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]
अनेकांनी प्रियंकाला तू ठीक आहेस का? काय लागलं आहे? असे प्रश्न विचारले आहेत. तर काहींनी तिच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली आहे. OMG! प्रियांका तुला हे काय झालं असं काहींनी म्हटलं आहे. प्रियांकाची जखम पाहून अनेकांना तिची काळजी वाटत आहे. मात्र असं असलं तरी गोष्ट मात्र काही वेगळीच आहे.
https://www.instagram.com/p/Cc9TIUwpJaM/
काय आहे व्हायरल फोटो मागील सत्य? Priyanka Chopra
प्रियांका चोप्राचा हा जखमी अवस्थेतील फोटो म्हणजे एका शुटवेळी तिने केलेला मेकअप आहे. सध्या प्रियांका एका मोठ्या चित्रपटाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. या शुटवेळी प्रियंकाला जखम झाल्याचा एक सीन आहे. याकरता प्रियंकाने चेहऱ्याला जखम झाल्याचा मेकअप केला होता. प्रियंकाने हाच फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करून “Did u have a tough day at work as well?” असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी प्रियांकाची काळजी करू नये. तिला काहीही दुखापत झालेली नसून तिची जखम म्हणजे केवळ शूट साठी केलेला मेकअप आहे. लवकरच प्रियांका आपल्या नव्या चित्रपटाबाबत अनाउंसमेंट करेल.
https://www.instagram.com/p/CYP7OEcNOVO/
https://www.instagram.com/p/CTLyU2CrMrk/
https://www.instagram.com/p/CHEkdEYjQ15/
https://www.instagram.com/p/CDs0xvMDuB0/
महत्वाच्या बातम्या –
Bollywood : आपल्या सौंदर्यामुळे ‘या’ अभिनेत्रीने गमावला ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट
Google वर चुकूनही सर्च करू नका ‘या’ 3 गोष्टी, अन्यथा जावे लागेल थेट तुरुंगात
Stock Market : भारतीय शेअर बाजारात सतत घसरण का होते आहे ??? त्यामागील कारणे समजून घ्या
Guarantee-Warranty : गॅरेंटी-वॉरंटीमध्ये काय फरक आहे ??? अशा प्रकारे समजून घ्या
योगा करताना जॅकलिन फर्नांडिसची Oops Movement! पहा व्हिडिओ