Wedding Insurance policy| भारतामध्ये लग्न समारंभ मोठ्या थाटामाटा साजरी केले जातात. या लग्नासाठी सलग चार-पाच दिवस मोठमोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांवर लाखो रुपये ही खर्च केले जातात. मात्र काही कारणांमुळे हे लग्न रद्द झाले किंवा पुढे ढकलण्यात आले तर दोन्ही कुटुंबाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे ती बाब लक्षात घेऊन आज काल अनेकजण लग्न सोहळाचाही विमा करतात. या विम्यामुळे लग्नात खर्च झालेले सर्व पैसे पुन्हा मिळून जातात. तसेच कोणतेही आर्थिक नुकसान होण्याची भीती उरत नाही. आज आपण याच विम्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)च्या डेटानुसार, या वर्षी देशभरात सुमारे 35 लाख विवाह होणार आहेत. ज्यामध्ये अंदाजे 4.25 लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ग्लोबल वेडिंग सर्व्हिसेस मार्केटच्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये विवाह सोहळ्यांवरील खर्च 60.5 अब्ज डॉलर होता. जो 2030 पर्यंत 414.2 बिलियनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. परंतु बऱ्याच वेळा अशा मोठ्या समारंभांमध्ये एका चुकीमुळे अघटित घटना घडतात. ज्यात लग्न रद्द करणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्फोट होणे, नैसर्गिक आपत्ती येणे अशा गोष्टींचा समावेश असतो.
वेडिंग इन्शुरन्स पॉलिसीची माहिती (Wedding Insurance policy)
एखाद्या लग्नकार्यात अशी कोणती घटना घडली तर त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. यालाच पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी आता वेडिंग इन्शुरन्स पॉलिसीसारख्या योजना आणल्या आहेत. या पॉलिसी संरक्षक कवच म्हणून करतात. त्याचा प्रीमियम प्रत्येक इव्हेंटच्या आधारावर ठरवला जातो. कोणत्याही कारणास्तव लग्न रद्द झाल्यास किंवा इतर कोणत्याही कारणास्तव तारीख बदलली गेली तर हॉटेल आणि वाहतूक बुकिंगसह इतर ज्या ज्या गोष्टींवर खर्च करण्यात आला आहे, त्या खर्चाची विमा कंपनी भरपाई देते.
विम्याचे काही नियम आणि अटी
वेडिंग इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ॲड-ऑन आणि रायडर्सचीही सुविधा आहे. ज्याअंतर्गत लग्नाच्या ठिकाणी जात असताना वाटेमध्येच काही अनुचित प्रकार घडला तर त्यावेळी रायडर्स तेथे मदत करू शकतात. मात्र, प्रत्येक विम्याचे काही नियम, अटी आणि कायदे असतात. उदाहरणार्थ, कोणत्याही जन्मजात आजारामुळे, अपहरणामुळे किंवा आत्महत्यामुळे मृत्यू झाला तर विमा कंपनी त्याची जबाबदारी घेत नाही. यासह दहशतवादी हल्ला किंवा अनैसर्गिक इजा झाल्यास विमा वैध राहत नाही.
कोणत्या कंपन्या हा विमा देते??
सध्या अनेक कंपन्या ही विमा पॉलिसी देत आहेत. ज्यात बजाज अलियान्झ, आयसीआयसीआय लोम्बार्ड, नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल इन्शुरन्स या कंपन्यांचा समावेश आहे.