Weird Foods : कांदा- लसणाची फोडणी देऊन चिनी लोक खातात दगड; VIDEO पहाल तर चक्रावून जाल

Weird Foods
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Foods) आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे विचित्र फूड फ्युजन पाहिले असाल, चाखले असाल. कारण, देशात आणि देशाबाहेर विविध संस्कृतीचे पालन करणारे लोक आपापली खाद्यसंस्कृती जपताना दिसतात. मात्र, या सगळ्यात चिनी लोकांची बातच काही और आहे. त्यांच्या खाद्य संस्कृतीमध्ये कोणता प्राणी पदार्थाच्या रुपात आढळेल याबद्दल काहीही सांगू शकत नाही.

(Weird Foods) कधी ऑक्टोपस, कधी उंदीर, कधी साप तर कधी बघून किळस वाटेल असे वेगवेगळे प्राणी आणि पक्षी हे चिनी लोक अगदी मिचक्या मारत खातात. त्यामुळे हे लोक काहीही खाऊ शकतात याबद्दल आता काही शंका उरलेली नाही. अशातच आता काय तर म्हणे, हे लोक दगडसुद्धा खातात. होय. हे नुसतं म्हटलं जात नाहीये तर तसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

कांदा- लसणाची फोडणी दिलेला दगडाचा खाद्यपदार्थ (Weird Foods)

आतापर्यंत चिनी लोक प्राणी, पक्षी खाताना दिसून आले आहेत. ज्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची कायमच चर्चा असते. अशातच आता चीनमध्ये बनवल्या जाणाऱ्या एका अनोख्या पदार्थाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. हा पदार्थ म्हणे दगडापासून बनवला जातो. या पदार्थाला ‘स्टोन च्यूस डिश’ म्हणून ओळखले जाते.

(Weird Foods) सध्या सोशल मीडियावर हा पदार्थ बनवतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. असे समोर आले आहे की, दगडापासून हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी चिनी लोक नदीतील गुळगुळीत दगड गोटे गोळा करतात. हे दगड तेलामध्ये फ्राय केले जातात आणि त्यानंतर आलं, लसूण, कांदा याची फोडणी देऊन विविध प्रकारचे मसाले टाकून हा दगडाचा खाद्यपदार्थ बनवला जातो.

दगड खायला मोजतात २०० रुपये

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, कशाप्रकारे तो शेफ तव्यावर दगड भाजत आहे. त्यात कांदा, लसूण आणि इतर पदार्थ घालून हा पदार्थ तयार केला जात आहे. त्यानंतर एका सर्व्हिंग बाऊलमध्ये हे दगड काढून त्यावर विशिष्ट प्रकारची चटणी घातली जात आहे आणि तयार डिश ग्राहकांना सर्व्ह करत आहेत. (Weird Foods) महत्त्वाची आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे चीनमधील अनेक हॉटेल्समध्ये हा पदार्थ मोठ्या प्रमाणात विकला जातो. नुसते दगड खाण्यासाठी इथले लोक चक्क २०० रुपये मोजतात.

दगड चोखतात आणि…

फोडणी दिलेले हे दगड केवळ चौखले जातात आणि त्यावरील चटकदार मसाला चाटून खाल्ला जातो. यानंतर चोखून बाजूला काढलेले दगड हे चिनी लोक म्हणे घरी घेऊन जातात. घरी घेऊन गेलेल्या दगडाचं ते काय करतात? हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण केवळ वेगवेगळ्या पदार्थ आणि चटण्यांमध्ये बुडवलेले दगड चोखण्यासाठी हे चिनी लोक मोठमोठ्या हॉटेलात जातात एवढं खरं!! आज पर्यंत अनेक खवय्यांनी विविध प्रकारचे पदार्थ खाल्ले असतील. पण एखादा खाद्यपदार्थ म्हणून दगड खाताना कोणाला पाहिलं नसेल. आता ती कसरसुद्धा चिनी लोकांनी भरून काढली आहे, असे म्हणायला हरकत नाही. (Weird Foods)