Loneliness : जीवघेणा एकटेपणा!! एकाकी राहिल्याने होऊ शकतो मृत्यू; संशोधनात धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loneliness) संपूर्ण जगभरात विविध स्वभावाचे विविध आवडीनिवडी असलेले लोक राहत आहेत. प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीबाबत एक वेगळा दृष्टिकोन असतो. प्रत्येकाची एखाद्या प्रसंगात वागण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. अनेक लोक अत्यंत स्पष्ट व्यक्ते असतात तर काही लोक मनात ठेवून वागणारे असतात. काही लोकांना चार चौघात मिसळून जगणे फार आनंददायी वाटते. तर काही लोक मात्र एकटे राहणे पसंत करतात. गेल्या काही काळात एकाकी राहणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याचे एका संशोधनात समोर आले आहे.

अमेरिकेच्या ‘अमेरिकन सायकॉलॉजिस्ट’ या प्रतिष्ठित मासिकामध्ये या संशोधनाबाबत विशेष माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या संशोधनातून अत्यंत धक्कादायक असा खुलासा करण्यात आला आहे. (Loneliness) तज्ञांनी केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, एकटेपणा हे मृत्यूचे मुख्य कारण ठरू शकते. या संशोधनात आणखी काय खुलासे झाले याबाबत सविस्तर माहिती घेऊया.

एकटेपणाची समस्या महामारी बनेल (Loneliness)

तज्ञांनी केलेल्या संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, १९४६ ते १९६४ दरम्यान जन्मलेले लोक आणि १९६५ ते १९८० दरम्यान जन्मलेले लोक हे सध्या सर्वाधिक एकटेपणाचे शिकार ठरले आहेत. जगभरातील विविध ठिकाणी अशी लोक एकाकी जीवन जगत आहेत. (Loneliness) २००७ ते २००९ च्या अखेरीस मध्यमवयीन लोकांमध्ये अत्यंत वाईट मानसिक आणि शारीरिक आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्याचे देखील यातून समोर आले आहे. यानुसार, २०२३ पर्यंतची परिस्थिती पाहता येत्या काळात ‘एकटेपणा ही समस्या महामारी बनेल’, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

जबाबदाऱ्यांसोबत वाढते आजारपण

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार २००२ ते २०२० मध्ये जन्म झालेल्या लोकांमध्ये एकटेपणाची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर, मध्यमवयीन असतेवेळी यातील बऱ्याच लोकांचा मृत्यू झाल्याचेदेखील यात आढळून आले आहे. याचे मुख्य कारण जबाबदाऱ्या, ताण तणाव आणि आजारपण असल्याचे सांगण्यात आले आहे. (Loneliness) वृद्ध पालक, लहान मुले, कुटुंब अन कामाची जबाबदारी यामुळे मध्यमवयीन लोकांमध्ये नैराश्य, जुनाट आजार, वेदना आणि अपंगत्वाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.

जीवघेणा एकटेपणा

एका मर्यादेनंतर जबाबदारीचं ओझं वाटू लागतं. ज्याचा परिणाम साहजिकच मानवी शरीरावर आणि मेंदूवर होऊ लागतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यात बिघाड होऊ लागतो. नैराश्य, गंभीर आजार, वेदना, जुनाट रोग, अपंगत्व, हृदय संबंधित समस्या, पोटाचे आजार, नकारात्मक विचार यामुळे अकाली मृत्यूचा धोका वाढतो.

गेल्या काही काळात एकटेपणा (Loneliness) ही जागतिक आरोग्य समस्या बनली आहे. त्यामुळे आपल्या आसपासची कोणतीही व्यक्ती एकटी असल्याचे जाणवल्यास तिचा आधार बना. तिला सोबत द्या. सामाजिक बंध दृढ करा. ज्यामुळे समाजातील लोकांचा एकटेपणा दूर होईल किंवा कमी होईल. परिणामी, अकाली मृत्यूचे प्रमाण देखील आटोक्यात आणता येईल.