कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात दुर्गामुर्ती विसर्जना (Durgamurti immersion) वेळी एक दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत नदीला अचानक पूर आल्याने 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल बुधवारी संध्याकाळी जलपाईगुडी जिल्ह्यातील मलबाजार भागातील माळ नदी परिसरात घडली आहे. या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
दुर्गामाता विसर्जना वेळी नदीला अचानक आला पूर, 7 जणांचा मृत्यू pic.twitter.com/7YROTQSHFv
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 6, 2022
काय घडले नेमके?
काल संध्याकाळी माळ नदीवर दुर्गा मूर्तीचे विसर्जन (Durgamurti immersion) करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पोहोचले होते. या दरम्यान अचानक पाण्याची पातळी वाढू लागली. यामुळे लोकांची तारांबळ उडाली. आणि या दुर्घटनेत सात जणांचा बुडून मृत्यू झाला तर 40 जण बेपत्ता झाले असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्याला सुरुवात केली.
या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक लोक मूर्ती विसर्जनासाठी (Durgamurti immersion) नदीत उतरताना दिसत आहेत. यादरम्यान नदीची पाण्याची पातळी अचानक वाढली, लाटा इतक्या वेगाने वाढल्या की अनेक लोक त्यात अडकले आणि वाहू लागले. यामुळे घटनास्थळी आरडाओरडा होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय