हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसवर हिंसाचाराचे गंभीर आरोप लावले आहेत. या हिंसाचारात कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचा दावा भाजपानं केला आहे. त्यानंतर भाजपाच्या पश्चिम बंगाल युनिटनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट टाकली आहे. त्या व्हिडिओत चुकीचा फोटो वापरल्याने मोठी नाचक्की झाली
या व्हिडीओत असा दावा करण्यात आला आहे की, माणिक मोइत्रा नावाच्या एका व्यक्तीला सीतलकूची येथे मारण्यात आलं आहे. पण भाजपाने या व्हिडीओत ज्या व्यक्तीचा फोटो वापरला आहे तो एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनेलचा पत्रकार अभ्रो बनर्जी यांचा आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर भाजपाने ९ लोकांच्या नावाची यादी जारी केली आहे. ज्यात मोमिक मोइत्रा, मिंटू बर्मन यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु माणिक मोइत्रा नावाने कोणाची ओळख पटली नाही.
I am Abhro Banerjee, living and hale and hearty and around 1,300 km away from Sitalkuchi. BJP IT Cell is now claiming I am Manik Moitra and died in Sitalkuchi. Please don't believe these fake posts and please don't worry. I repeat: I am (still) alivehttps://t.co/y4jKsfx8tI pic.twitter.com/P2cXJFP5KO
— Abhro Banerjee (@AbhroBanerjee1) May 6, 2021
या प्रकरणात अभ्रो बनर्जी यांनी सांगितले की, आज सकाळी उठण्यासाठी मला थोडा वेळ झाला. तेव्हा मोबाईलवर पाहिलं की १०० पेक्षा अधिक मिस कॉल येऊन गेले. एवढे मिसकॉल पाहून मला धक्का बसला त्यानंतर अरविंद नावाच्या मित्राने फोन करून सांगितलं भाजपाच्या आयटी सेलने माणिक मोइत्राऐवजी तुझ्या फोटोचा वापर केला आहे. हा व्हिडीओ पाहून मी चकीत झालो असं त्यांनी म्हटलं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.