‘चॅम्पियन’ ड्वेन ब्राव्होचा विश्वविक्रम!! T-20 मध्ये घेतले तब्बल ‘येवढे’ बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो याने टी२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्याविक्रमाला गवसणी घातली आहे. टी२० क्रिकेटमध्ये ५०० बळी टिपणारा ड्वेन ब्राव्हो हा जगातील पहिला खेळाडू ठरला. कॅरेबियन प्रिमियर लीग २०२० च्या सामन्यात ब्राव्होने सेंट ल्युसिया झोक्सचा फलंदाज रखीम कॉर्नवॉलला बाद करत ही कामगिरी केली. ब्राव्होने आत्तापर्यंत ५४९ टी२० सामन्यात ५०० बळी घेण्याची किमया साधली. आंतरराष्ट्रीय टी२० सामने आणि जगभरातील अनेक टी२० लीग स्पर्धा यांमध्ये मिळून ब्राव्होने हा विक्रम केला.

टी२० क्रिकेटमधील सर्वाधिक बळींच्या यादीत ड्वेन ब्राव्होनंतर दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आहे. त्याच्या नावावर ३९० बळी आहेत.

आयपीएल मध्ये ब्रावो चेन्नई सुपर किंगचे प्रतिनिधित्व करतो. चेन्नईला यावर्षीही ब्रावो कडून दमदार कामगिरीची अपेक्षा असणार यात शंकाच नाही.चेन्नईसह ब्राव्हो आतापर्यंत जवळपास २१ वेगवेगळ्या संघांकडून टी२० सामने खेळला आहे. टी२० मध्ये ५०० बळी घेण्याबरोबरच ब्राव्होने कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये १०० बळीदेखील पूर्ण केले. अशी कामगिरी करणाराही तो एकमेव खेळाडू ठरला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment