Western Railways : मुंबईकरांची गर्दीपासून सुटका होणार; गणेश विसर्जनानिमित्त पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय

Western Railways
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Western Railways सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. खास करून मुंबई आणि पुणे सारख्या शहरात तर गणेशोत्सवाला भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळते. अशावेळी भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आधीच एसटी बस आणि रेल्वेने अतिरिक्त गाड्या वाढवल्या आहेत, तर काही ठिकाणी ट्रेनच्या वेळेत बदल केले आहेत. आता 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून त्यादिवशी वाजत गाजत गणरायाला निरोप दिला जातो. त्यावेळीही मुंबईत भक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने ६ आणि ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान काही विशेष लोकल गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

रेल्वेने ट्विट करत दिली माहिती- Western Railways

पश्चिम रेल्वेने याबाबत एक ट्विट करत म्हंटल कि, गणपती विसर्जनाच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, पश्चिम रेल्वे ०६/०७ सप्टेंबर २०२५ च्या मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान सहा जोड्या अतिरिक्त विशेष लोकल गाड्या चालवणार आहे. या पोस्टसह रेल्वे विभागाने लोकल ट्रेनचे नवीन वेळापत्रक सुद्धा सादर केल आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, दादर, अंधेरी, बोरिवली आणि वसई रोड यासारख्या प्रमुख स्थानकांवर नियमित अंतराने विशेष गाड्या चालवल्या जातील. तर ६ आणि ७ सप्टेंबर २०२५ च्या मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान सहा जोड्या अतिरिक्त विशेष लोकल गाड्या धावतील. (Western Railways)

दरम्यान, गणेशोत्सव काळात लालबागचा राजा, गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि जीएसबी सेवा मंडळ यासारख्या सार्वजनिक मंडळांमध्ये मोठी गर्दी होते, भाविकभक्त अनेकदा आशीर्वाद घेण्यासाठी तासनतास रांगा लावतात. परिणामी मोठी गर्दी बघायला मिळते. आरत्या, भजन, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मुंबई भक्तांनी भरते. याचमुळे अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railways) चर्चगेट आणि विरार दरम्यान अतिरिक्त ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.