हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या जगण्यात मिठाचे (Salt) स्थान खुपच महत्वाचे आहे. जेवणात अन्य मसाले, तिखट एक वेळ कमी असेल तर चालेल पण मीठ तर हवंच. पण तुम्हाला माहितीये का, मर्यादेपेक्षा अधिक मीठ खाल्याने तुमच्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात ते? नसेल माहित तर माहिती करून घ्या. कारण यामुळे तुमचे आरोग्य आणि तुमचा कष्टाने कमवलेला पैसा हॉस्पिटलच्या बिल भरण्यात जाण्यापासून वाचू शकतो .
काही दिवसांपूर्वी नेचर मेडिकल जर्नल मध्ये पब्लिश झालेल्या रिपोर्ट नुसार भारतात प्रत्येक व्यक्ती मर्यादेपेक्षा अधिक मीठाचे सेवन करतो . साधारणपणे रोज 5 ग्राम मिठाचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी योग्य असते . परंतु भारतातील लोक दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक म्हणजेच तब्बल 8 ग्रॅम मिठाचे सेवन रोज करतात . यामुळे भारतीयांमध्ये मिठाच्या अधिक सेवणामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढत आहे.
राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार नियंत्रण सर्वेक्षण ( National Non communicable disease monitoring survey ) अंतर्गत भारतातील 3000 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. ज्याच्या माध्यमातून या 3000 लोकांच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण तपासण्यात आले. जे की गरजेपेक्षा अधिक आढळून आले आहे. ज्या लोकांमध्ये हे प्रमाण अधिक आढळून आले त्यांच्या मीठ सेवनाच्या सवयी तपासल्यानंतर असं समोर आलं की ते गरजेपेक्षा अधिक मीठ आहारात घेतात .
अधिक मीठ खाण्याचे काय आहेत दुष्परिणाम :
आपल्या शरीरातील पाण्याचे व अन्य महत्वपुर्ण द्रव्याचे बॅलन्स कायम ठेवण्यासाठी मिठाची आपल्या शरीराला गरज असते मात्र मिठाचे प्रमाण अधिक वाढले तर त्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात.
1) उच्च रक्तदाब
आहारात मिठाचे प्रमाणा अधिक असल्यास पेशीमधील बाहेरील भित्ती वर दाब वाढतो . त्यामुळे सोडियमचे रक्तातील प्रमाण वाढून त्यामुळे धमण्यावर दाब येऊन हृदय विकाराचा झटका येऊ शकतो .
2) किडनीचे आजार
मिठाचे प्रमाण शरीरात वाढल्यास किडनी वर ताण येऊ शकतो . किडनीच्या क्षमतेपेक्षा अधिक सोडियम शरीराबाहेर टाकणे ताण निर्माण करणारे ठरु शकते. त्यामुळे किडनीचे अनेक आजार यामुळे समोर येऊ शकतात .
3) पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो:
अभ्यासात असे म्हटले आहे की जास्त मीठयुक्त आहारामुळे पोटाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो कारण त्यामुळे पोटाच्या अस्तरांना जळजळ होते किंवा अल्सर होण्याची शक्यता असते .
अधिक मीठ खाण्याच्या सवयी पासून कशी मिळवाल सुटका :
मुख्यतः ताजे, कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थ खा
कमी-सोडियम उत्पादने निवडा (120mg/100g सोडियम पेक्षा कमी)
मीठ जास्त न घालता शिजवा
मीठाऐवजी औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर अन्नाला चव आणण्यासाठी करा
सॉस, आणि झटपट उत्पादनांचा वापर मर्यादित करा
प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा वापर कमी करा