मुंबई | तब्बल ७ वेळा लोकसभेत दादरा – नगर – हवेलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका आदिवासी खासदाराला आत्महत्या करायला लावण्याचं काम केंद्रातील मोदी सरकारने आणि गुजरातमधील भाजप सरकारने केलं आहे. मोहन डेलकरांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये इशारा केला आहे. ते पंतप्रधानांना भेटले, गृहमंत्र्यांनाही भेटले. लोकसभेत ५६ इंच छातीचे पंतप्रधान आहेत पण जिथे खासदारच सुरक्षित नाहीत, तर देशाची जनता सुरक्षित कशी असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेल मध्ये दादरा – नगर – हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून महाराष्ट्रातील वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येवरून भाजपला इशारा दिलेला असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.