काय सांगता ! भारतातील ‘या’ गावात आहेत 200 हून अधिक जुळे लोक; वाचा यामागचे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Twin Village Of India : आज नेशनल ट्विन्स डे आहे. म्हणजेच जे भाऊ- बहीण किंवा भाऊ- भाऊ जुळे होऊन जन्माला आले आहेत, त्यांसाठी हा दिवस साजरा केला जातो. तसे पाहिले तर जुळी मुले पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटत असते. मात्र आज आम्ही तुम्हाला एक अशीच थक्क करणारी गोष्टी सांगणार आहे. ज्यामध्ये एका गावात चक्क जुळे भाऊ आणि बहिणी इतके सामान्य आहेत त्या गावात चक्क २०० हुन अधिक लोक जुळे आहेत.

हे कोडिन्ही गाव आहे जे भारतातील दक्षिणेकडील राज्य केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात आहे, ज्याला ‘ट्विन व्हिलेज ऑफ इंडिया’ किंवा ‘ट्विन टाउन’ म्हटले जाते. या गावात जुळ्या मुलांच्या 200 हून अधिक जोड्या आहेत, जुळ्या मुलांचा जन्मदर येथे सर्वाधिक आहे, जगभरातील शास्त्रज्ञ हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आजपर्यंत त्यांना कोणतेही ठोस उत्तर मिळू शकलेले नाही. जर तुम्ही या गावात गेला तर हैराण व्हाल. कारण साधारण गावासारखं वाटणाऱ्या या गावात सगळेच लोक सारखे दिसतात. इथल्या रस्त्यावर फिरायला निघालं की लगेच सारखे चेहरे दिसू लागतील. एकाच ठिकाणी इतकी जुळी मुले कशी अस्तित्वात आहेत यावर विश्वास ठेवणे तुम्हाला कठीण जाईल.

या गावात जास्त लोक नाहीत

कोडिन्ही हे मुस्लिमबहुल गाव आहे जे कोचीपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. या गावात 2000 हून अधिक कुटुंबे राहतात. पण 200 हून अधिक जुळ्या जोड्या सर्वांनाच चकित करतात.

अपंगत्व नाही

चांगली गोष्ट म्हणजे या जुळ्या मुलांना जन्माच्या वेळी किंवा नंतर कोणत्याही मानसिक किंवा शारीरिक अपंगत्वाचा सामना करावा लागला नाही, या जुळ्या मुलांच्या मातांना देखील आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागला नाही.

ट्विन कॅपिटल्स

कोडिन्ही गावात, दर हजार जन्मांमागे 45 मुले जुळी मुले जन्माला येतात, अशा प्रकारे जुळी मुले निर्माण करणारे हे गाव जगातील दुसरे मोठे गाव आहे. नायजेरियातील इग्बो-ओरा गावात प्रत्येक हजार मुलांपैकी 145 जुळी मुले जन्माला येतात, म्हणून याला ‘जगाची जुळी राजधानी’ म्हटले जाते.