एक अपराधी मारला गेला पण त्याला संरक्षण देणाऱ्यांचे काय? प्रियंका गांधींचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गँगस्टर विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं. त्यानंतर आता या एन्काऊंटरसंबंधी राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सुद्धा टि्वट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय?’ असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

काल विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक झाल्यानंतर प्रियंका गांधी यांनी योगी सरकारवर टिका करणारे टि्वट केले होते. “कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते. पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला” असे प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

असा मारला गेला विकास दुबे
कानपूर पोलिस हत्याकांडातील प्रमुख आरोपी गँगस्टर विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. विकास दुबेला अटक केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक( एसटीएफ) त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. अपघातानंतर विकास दुबेनं एसटीएफच्या एका अधिकाऱ्याच्या हातातला पिस्तुल हिसकावून घेतला आणि घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”