हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर त्याच्या Facebook अकाउंटचे काय होत असेल, असा प्रश्न कधी आपल्या मनात डोकावला आहे का ??? हे जाणून घ्या कि, गुगलप्रमाणेच फेसबुकमध्येही यासाठी एक सेटिंग आहे, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर फेसबुककडून त्याचे खाते, प्रोफाइल, फोटो आणि पोस्ट यासारखी सर्व माहिती डिलीट केली जाते. जर त्यांना हवे असेल तर त्यांची प्रोफाइल मेमोरियल म्हणूनही सोडली जाऊ शकते, जी दुसऱ्या कोणालातरी मॅनेज करता येईल. जर युझरला त्याच्या मृत्यूनंतर फेसबुकवरून त्याचा सर्व डेटा डिलीट करायचा असेल. त्यासाठी त्यांना आधीच तशी सेटिंग करावी लागेल. चला तर मग त्याविषयी जाणून घेऊयात …
Facebook वर अशा प्रकारे तयार करा मेमोरियल :
सर्वांत आधी Facebook App वर जा.
नंतर उजवीकडे वरच्या बाजूला प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
त्यानंतर Settings आणि privacy मधून Settings वर जा.
नंतर Access and Control वर टॅप करा.
नंतर Memorialisation settings मध्ये जा.
आता Choose Legacy Contacts निवडा.
यानंतर युझरला येथून अशा एका व्यक्तीला ऍड करता येईल जो मृत्यूनंतर त्याचे फेसबुक अकाउंट मॅनेज करेल.
खाते डिलीट करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स :
जर युझरला आपले फेसबुक पेज मेमोरियल म्हणून राहू द्यायचे नसेल तर त्याच्याकडे ते कायमस्वरूपी डिलीट करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असेल. याबाबत Facebook ने सांगितले की, यासाठी फेसबुकला कोणीतरी युझरचा मृत्यू झाल्याचे सांगावे लागेल. यानंतर, कंपनीकडून युझरचे फोटो, पोस्ट, कमेंट्स आणि रिप्लाय यांसारखी सर्व माहिती तात्काळ डिलीट केली जाईल.
हे युझरच्या मुख्य प्रोफाइलसाठी असेल. यासाठी युझरला फेसबुकच्या उजवीकडे वरच्या बाजूला त्याच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करावे लागेल.
यानंतर, Settings and privacy निवडा, त्यानंतर Settings वर क्लिक करा.
यानंतर, Access and Control मधून Memorialisation settings मध्ये जावे लागेल.
त्यानंतर Delete after death वर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.facebook.com/
हे पण वाचा :
Jan Dhan Account उघडताच मिळतो 10 हजारांचा लाभ, कसे ते जाणून घ्या
Bank Account शी मोबाईल नंबर लिंक करणे महत्त्वाचे का आहे??? जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
Bandhan Bank च्या ‘या’ FD वर आता मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे नवीन दर तपासा
Samsung Galaxy F04 : सॅमसंग भारतात लॉन्च करणार 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन