नवी दिल्ली । जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मृत व्यक्तीच्या ATM कार्डद्वारे त्याच्या खात्यातून पैसे काढता येतील, तर हे लक्षात घ्या की असे करणे हा दंडनीय गुन्हा आहे. जर तुम्ही त्या बँक खात्याचे जॉईंट होल्डर असाल तरच तुम्ही पैसे काढू शकाल, अन्यथा तो गुन्हा ठरेल. त्यामुळे आता प्रश्न असा पडतो की, जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या खात्यातून पैसे कसे काढता येतील?
बँक खाते उघडताना, बँक अनेक प्रकारची माहिती विचारते. यावेळी बँक नॉमिनीचे नाव देखील टाकण्यास सांगते. बँकेने ते का मागितले आणि नॉमिनी निवडणे किती महत्त्वाचे आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बँक खात्यात नामांकन केल्याने तुम्हाला तुमच्या कुटुंबाला होणारा त्रास टाळता येईल.
ज्यांनी तरुणपणीच बँक खाती उघडली आहेत, मात्र ते आता ज्येष्ठ आहेत, त्यांनी नामांकन केले असले तरी नॉमिनी व्यक्ती घोषित करावे. तुम्हाला माहिती आहे का, जर एखाद्या व्यक्तीचा बचत खात्यात नाव नोंदवल्याशिवाय मृत्यू झाला तर काय होते? मृत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढण्याचे काही मार्ग आहेत. अशा वेळी तीन प्रकारच्या परिस्थिती असू शकतात ज्यामध्ये पैसे काढता येतात.
मृत व्यक्तीसह जॉईंट अकाउंट
मृत व्यक्तीसोबत एखाद्या व्यक्तीचे जॉईंट अकाउंट असल्यास, खात्यातील रक्कम दुसरी व्यक्ती काढू शकते, कारण संपूर्ण रक्कम जॉईंट होल्डरकडे हस्तांतरित केली जाते. अशा स्थितीत खात्यातून मृत व्यक्तीचे नाव काढून टाकण्यासाठी त्याच्या डेथ सर्टिफिकेटची कॉपी बँकेच्या शाखेत जमा करावी लागेल. यानंतर बँक मृत व्यक्तीचे नाव जॉईंट अकाउंटमधून काढून टाकेल.
आपण नॉमिनी असाल तर
जर नॉमिनी असेल तर बँक खात्यात उपलब्ध असलेले पैसे नॉमिनीला दिले जातात. पैसे देण्यापूर्वी, बँक नॉमिनी तसेच डेथ सर्टिफिकेटची ऑरिजिनल कॉपी व्हेरिफाय करते. नामांकनाबाबत वाद असेल आणि मृत्युपत्राची एक कॉपी (मृत व्यक्तीची इच्छा व्यक्त करणारा कायदेशीर डॉक्युमेंट) बँकेकडे असणे आवश्यक आहे, ही प्रक्रिया लांबलचक असू शकते. पैसे मिळाल्याच्या वेळी, मूळ नॉमिनीला पैसे दिले गेले आहेत याची खात्री करण्यासाठी बँक दोन साक्षीदारांना विचारते.
नॉमिनी नसेल तर
खात्यात नॉमिनी नसल्यास, पैसे मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्तीला दीर्घ कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल. त्याला मृत्यूपत्र किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र द्यावे लागेल, जे हे सिद्ध करते की त्याला मृताचे पैसे मिळाले पाहिजेत.
कोणी क्लेम केला नाही तर
जर बँक खाते आणि पैशांवर क्लेम कोणीही करत नसेल तर अशा परिस्थितीत बँक खाते बंद करून इनऍक्टिव्ह अकाउंटमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने क्लेम करताच, बँक संबंधित बँक खात्यातील उपलब्ध बॅलन्स कायदेशीर वारसाकडे ट्रान्सफर करू शकते. मात्र क्लेम न केल्यास, खाते इनऍक्टिव्ह अकाउंटमध्ये रूपांतरित केले जाते.
उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणजे काय?
उत्तराधिकार प्रमाणपत्र (Succession Certificate) हे एक असे डॉक्युमेंट आहे जे मृत व्यक्तीच्या वारसांना दिले जाते, जर मरण पावलेल्या व्यक्तीने मृत्युपत्र सोडले नसेल. मृत्युपत्र न लिहिलेल्या मृत व्यक्तीच्या वारसाला उत्तराधिकार प्रमाणपत्र दिले जाते.