बिग बाॅस फेम सातारचा अभिजीत बिचकुले सध्या पुण्यात काय करतोय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेनं आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या मात्र राजकीय क्षेत्रात यश न मिळू शकल्याने आता त्याने नवा वाटेवर वाटचाल सुरू केलेली आहे. अभिजीत बिचकुलेने नुकताच त्याने पुण्यात स्वतःचा ‘सातारा कंदी पेढे’ विक्री व्यवसाय सुरू केलाय. बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा स्पर्धक पराग कान्हेरे याने नुकतीच ही बातमी कळवलीय. त्यामुळे साताऱ्याच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांची चव आता पुणेकरांना बिचुकलेच्या दुकानात चाखायला मिळणार आहे. पुण्यातील शारदा गणपती मंदिराजवळ त्याने हे कंदी पेढ्यांचं दुकान थाटलंय.

सातारच्या अभिजीत बिचुकलेने नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्याने प्रयत्न केलेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तर अनेकदा राजकारणात दंड थोपाटले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यानं मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवलीय. या निवडणुकीत त्याला अवघी 150 मतं मिळाली होती. अलिकडेच झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अवघी 137 मतं त्याला मिळाली होती. परंतु, अभिजीत बिचुकले हा आता वेगळ्याचं कारणानं चर्चेत आलाय. अनेकांना प्रश्न पडला असेल की, बिचुकले सध्या काय करतोय?

बिग बाॅसच्या सिजन 2 च्या पर्वातही अभिजित बिचुकलेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं होतं. आता अभिजीत बिचुकले आणखी एका कारणामुळं प्रसिद्धीझोतात आलेला आहे. नुकताच त्याने पुण्यात स्वतःचा ‘सातारा कंदी पेढे’ विक्री व्यवसाय सुरू केलाय.  पुण्यातील शारदा गणपती मंदिराजवळ त्याने हे कंदी पेढ्यांचं दुकान थाटलंय. कान्हेरेनं बिचुकलेला त्यांच्या या नव्या व्यवसायासाठी हटक्या अंदाजात शुभेच्छाही दिल्या आहेत. ‘बिचुकले’ यावेळी नाही चुकले. असं म्हणून बिचुकलेचं पुण्यात स्वागत केलंय.