क्युसेक, टीएमसी आणि विसर्ग म्हणजे नक्की काय? जाणून घ्या सोप्या भाषेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमागूळ घातलेला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जुलैमध्ये खूप जास्त पाऊस झालेला आहे. आणि आता देखील पाऊस सुरूच आहे. महाराष्ट्रातील अनेक धरण देखील भरलेली आहे. त्यामुळे आता या भरणातून विसर्ग होण्यास देखील चालू झालेले आहे. अनेक गावात नद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आपल्याला नेहमीच क्युसेक, टीएमएस, विसर्ग हे शब्द ऐकायला येत आहेत. हे शब्द वापरून किती पाणी सोडले आहे, हे सांगितले जाते. परंतु अनेकांना अजूनही या शब्दांचे अर्थ माहित नाहीत. हे शब्द नक्की काय आहेत? हे आज आपण अत्यंत सोप्या भाषेत समजून घेण्याच्या प्रयत्न करू.

क्युसेक म्हणजे काय ? (Cusec)

क्यूसेक हा शब्द क्युबिट फिट पर सेकंद या एककाचे संक्षिप्त रूप आहे. यातून धरणाच्या बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे मापन केले जाते. एक क्युसिक म्हणजे दर सेकंदाला एक घनफूट एवढे पाणी धरणाच्या बाहेर सोडले जाते. आणि हे सोडलेले पाणी क्यूसेकच्या माध्यमातून मोजले जाते.

टीएमसी

टीएमसी हा थाउजंड मिलियन क्युबिक फिट या एककाचे संक्षिप्त रूप आहे. धरणातील पाण्याचा साठा मोजण्यासाठी हे एकक वापरले जाते. एक टीएमएस म्हणजे 1000 दशलक्ष घनफूट पाणी एवढे आहे. धरणात साठलेले पाणी मोजण्यासाठी हे एकक वापरले जाते.

विसर्ग

विसर्ग म्हणजे धरणातून सोडले जाणारे पाणी. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा अनेक धरणे भरतात आणि धरणे भरल्यावर त्यातून पाणी बाहेर सोडावे लागते. त्याला विसर्ग असे म्हणतात. हा विसर्ग किंवा टीएमसीमध्ये मोजला जातो. हा विसर्गमुळे अनेक नात्यांना पूर देखील येऊ शकतो. त्यामुळे आजूबाजूच्या भागात पूर्व परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेक वेळा विसर्ग हा आजूबाजूच्या गावांसाठी धोकादायक मानला जातो.