हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मियांसाठी दिवाळी हा सण सर्वात मोठा आहे. या दिवशी कुबेर देव आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. तसेच श्री गणेशाचे पूजन करण्यात येते. हिंदू धर्मामध्ये हा दिवस फटाकडे फोडून तसेच दिवे लावून फराळ बनवून साजरी केला जातो. खरे तर, दिवाळी सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. असे म्हणतात की, या दिवशी श्रीराम लंकापती रावणाचा वध करून पुन्हा आयोध्येत परतले होते. त्यांच्या येण्याचा दिवस साजरी करण्यासाठी पूर्ण अयोध्येत दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. तेव्हापासून ते आजवर प्रत्येक कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळी साजरी करण्यात येते.
इतकेच नव्हे तर, दिवाळी साजरी करण्यामागे अशी अनेक विशेष कारणे आहेत. तसेच या सणामागे सांस्कृतिक इतिहास दडलेला आहे. आज आपण हाच इतिहास आणि या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. दिवाळी साजरी करण्यामागे एक कथा अशी आहे की, या दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या अमावास्येला सम्राट विक्रमादित्यचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे सर्व राज्यात दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. आज देखील या कारणामुळे कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवे लावले जातात.
आणखीन एक पौराणिक कथा दिवाळी संदर्भात आपल्याला असे सांगते की, दिवाळीच्या एक दिवस आधी श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्यामुळे याचा उत्सव नरक चतुर्थीच्या दिवशी साजरी केला जातो. या दिवशी देखील फटाके फोडून दिवाळी साजरी केली जाते. यासोबतच, असे देखील म्हणतात की, दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करण्यात येते. अशा अनेक आणि विविध कारणांमुळे दिवाळी सण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरी केला जातो.