New Heat And Run Law: देशभरातून विरोध दर्शवण्यात आलेला ‘हिट अँड रन’ कायदा काय आहे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतंच केंद्र सरकारने हिट अँड रन विधेयक पास केलं आहे. या विधेयकाला राष्ट्रपतीहिट अँड रन द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हे मंजुरी मिळाली आहे. ज्यामुळे आता कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या असून हा आता एक नवा कायदा बनला आहे. मात्र आता या कायद्यामध्ये करण्यात आलेल्यातरतुदींना देशभरातून विरोध दर्शवला जात आहे. या कायद्यानुसार, एखादया अपघातात व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. अशा अनेक कडक तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आले आहेत. त्यामुळे हा कायदा नेमका काय सांगतो हे आपण जाणून घेऊया.

हिट अँड रन म्हणजे नेमकं काय? (New Heat And Run Law)

हिट अँड रन म्हणजेच एखादा वाहन चालक दुसऱ्या गाडीला धडक देऊन आपल्या वाहनासह तिथून फरार होऊन जातो. थोडक्यात, एखाद्या व्यक्तीला किंवा वाहनाला धडक दिली तसेच अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी चालक तेथून फरार झाला तर या प्रकरणाला हिट अँड रन असे म्हटले जाते. जुन्या कायद्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये चालकाला अटक झाल्यानंतर जामीन मिळत होता किंवा जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात येत होते. परंतु आता सुधारित कायद्यानुसार याचे नियम आणखीन कडक करण्यात आले आहेत.

सुधारित कायदा काय सांगतो?

भारतीय न्याय संहितेच्या कलम 104 मध्ये ‘हिट अँड रन’ (New Heat And Run Law) कायद्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. आता या सुधारित कायद्यानुसार, चुकीच्या पद्धतीने एका चालकाने वाहन चालवल्यास किंवा त्याच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास चालकाला जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा होईल तसेच त्याला दंड देखील ठोठावण्यात येईल. या शिक्षेचा कलम 104 मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, कलम 104B लिहले आहे की, अपघात झाला किंवा वाहनाला धडक दिल्यानंतर चालक स्वतः किंवा वाहनासह घटनास्थळावरून पळून गेला तर त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची भोगावी लागेल.

देशभरातून कायद्याला विरोध

सध्या हा नवीन कायदा आणल्यामुळे देशभरातील वाहन चालकांनी आणि ट्रक चालकांनी या कायद्याला विरोध दर्शवला आहे. सध्या यास कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तसेच चालकांनी संप पुकारले आहेत ज्यामुळे वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आता जोपर्यंत केंद्र सरकार पुन्हा या कायद्यामध्ये सुधारणा करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका चालकांनी घेतली आहे. (New Heat And Run Law)