हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खाजगी संपत्ती किती आहे? असा प्रश्न आजवर आपल्या सर्वांनाच पडला असणार. आज आम्ही तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. कारण, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे. त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या नावावर कोणतीही जीवन विमा पॉलिसी बनवण्यात आलेली नाही. तसेच, पंतप्रधान मोदींचा बँक बॅलन्स देखील फक्त 574 इतका आहे. आपल्याला ही माहिती खोटी वाटेल. परंतु ही सर्व माहिती प्राइम मिनिस्टर ऑफिसच्या म्हणजे PMO च्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींच्या खात्यावर फक्त 574 रुपये
या माहितीनुसारच, पंतप्रधान मोदी यांच्याकडे सोन्याच्या चार रिंग आहेत. ज्याची एकूण किंमत 2,01,660 इतकी आहे. तर, त्यांच्या नावावर कोणतीही खाजगी प्रॉपर्टी नाही. तसेच, मोदींनी कोणत्याही शेअर म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली नाही. इतकेच नव्हे तर, देशाच्या पंतप्रधानांकडे हक्काची फोर व्हीलर देखील नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फक्त 30,240 रुपये कॅश आहे. त्याचबरोबर, त्यांच्या खात्यावर 574 रुपये आहेत. मात्र, पीएम मोदी यांची एफडी 2 कोटी 47 लाख 44 हजार एवढी आहे. तसेच त्यांनी, पोस्ट ऑफिस नॅशनल स्कीममध्ये 9 लाख 19 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. पंतप्रधान मोदींचे बँक अकाऊंट देखील स्टेट बँक ऑफ इंडियात आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींचे एकूण संपत्ती मोजता त्यांच्याकडे फक्त 2 कोटी 58 लाख 96 हजार रुपये आहेत. दरवर्षी आर्थिक वर्षाच्या शेवटी पंतप्रधानांच्या संपत्तीची माहिती जनतेला देण्यात येते. त्यानुसार यावर्षी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी मोदींच्या संपत्ती चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.