हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कमी किंवा खराब कनेक्टिव्हिटी असलेल्या भागात वाय-फाय नेटवर्कच्या मदतीने Wi-Fi Calling द्वारे नियमित कॉल करता येतात. मात्र यासाठी आपला टेलिकॉम ऑपरेटर वाय-फाय कॉलिंगला सपोर्ट करत असेल आणि ग्राहकाकडे चांगले वाय-फाय कनेक्शन असेल तरच ही सुविधा वापरता येईल. जेव्हा नेटवर्क कनेक्टिव्हिटी कमी असते, तेव्हा याच्याशी कंपॅटिबल फोन ज्या टेलिकॉम ऑपरेटरचे सदस्यत्व घेतले आहे त्याद्वारे नियमित कॉल करण्यासाठी Wi-Fi नेटवर्कचा वापर करेल. भारतातील बहुतेक टेलिकॉम ऑपरेटर्स वाय-फाय कॉलिंगला सपोर्ट देतात. हे लक्षात घ्या कि, यासाठी टेलिकॉम ऑपरेटर कडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.
कमी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असलेल्या भागामध्ये ही वाय-फाय कॉलिंगची सुविधा विशेषतः फायदेशीर आहे. आपल्या स्मार्टफोनवर Wi-Fi कॉलिंग इनेबल्ड असेल तर ते नियमित व्हॉइस कॉल करण्यासाठी कनेक्ट केलेल्या Wi-Fi नेटवर्कचा वापर करेल. उदाहरणार्थ, जर आपण एखाद्या इमारतीच्या तळघरात असाल आणि आपल्या नेटवर्कची कनेक्टिव्हिटी कमी असेल मात्र चांगला वाय-फाय असेल तर आपल्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय नियमित व्हॉइस कॉल करता येऊ शकेल. या सुविधेद्वारे कॉलिंगची गुणवत्ता सुधारण्यात आणि कॉल ड्रॉप कमी होण्यास मदत होते. हे लक्षात घ्या कि, या वाय-फाय कॉलिंगची सुविधा VoLTE (व्हॉइस ओव्हर LTE) नेटवर्क ऐवजी VoIP (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) वर कॉल करते.
अशा प्रकारे Android स्मार्टफोनवर वाय-फाय कॉलिंग सुरु करा
अलीकडच्या काळात लॉन्च करण्यात आलेले बहुतेक फोन हे वाय-फाय कॉलिंगसाठी कंपॅटिबल आहेत. युझर्सना आपल्या फोनमधील नेटवर्क सेटिंग्जमध्ये जाऊन हा पर्याय तपासता येईल. तसेच हा पर्याय उपलब्ध नसेल आपला फोन Wi-Fi कॉलिंगसाठी सपोर्टेड नाही हे समजून घ्या. Android फोनवर वाय-फाय कॉलिंग सुरु करण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स…
यासाठी आपल्या Android स्मार्टफोनच्या Settings menu वर जा. यानंतर Networks विभागात जा (याला Connections विभाग किंवा Mobile Networks देखील म्हटले जाते).
Networks विभागात, Wi-Fi Preferences वर जा आणि Advanced वर क्लिक करा.
Wi-Fi कॉलिंग नावाचा पर्याय तपासा. जर आपल्या फोनमध्ये दोन सिम कार्ड असेल तर युझर्सना ते कोणत्या नंबरसाठी सुरु करायचे ते ठरवता येईल. युझर्सना ते दोन्ही नंबरसाठी देखील सुरु करता येईल.
काही फोनमध्ये, “Wi-Fi Calling on This iPhone” हा पर्याय थेट Networks विभागात दिला जातो. यासाठी Advanced विभागात जाण्याची गरज राहत नाही. मात्र वेगवेगळ्या Android फोनच्या OS स्किनमध्ये यासाठी वेगवेगळा मार्ग असू शकतो.
अशा प्रकारे iPhone वर वाय-फाय कॉलिंग सुरु करा
iPhoneनवर, जोपर्यंत टेलिकॉम ऑपरेटर त्याला सपोर्ट देत आहे तोपर्यंत वाय-फाय कॉलिंग सहजपणे एक्टिवेट केले जाऊ शकते. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
iPhone वरील Settings menu वर जा. Phone वर क्लिक करा.
त्यानंतर Mobile Data > Wi-Fi Calling वर क्लिक करा (हे फक्त तुमचा टेलिकॉम ऑपरेटर सेवेला सपोर्ट करतो की नाही हे सांगेल)
“Wi-Fi Calling on This iPhone” वर टॉगल करा.Wi-Fi Calling उपलब्ध असेल तर स्टेटस बारमध्ये आपल्या ऑपरेटरच्या नावामागे Wi-Fi लिहिलेले दिसेल. आता आपले वाय-फाय कॉलिंगद्वारे सुरू होईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/wifi-calling
हे पण वाचा :
Airtel च्या 200 रुपयांपेक्षा कमी प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 2GB डेटा
‘या’ प्लॅनअंतर्गत Vodafone Idea कडून दिला जात आहे 75GB पर्यंत अतिरिक्त डेटा !!!
Credit Card वर EMI करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात घ्या !!!
Personal Loan साठी अर्ज करण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा !!!
Car : CNG-हायब्रिड इंजिनमध्ये काय फरक आहे??? अशा प्रकारे समजून घ्या