कोरोना काळात सेक्स लाईफ कशी असावी? पहा काय सांगतायत तज्ञ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना काळ हा सर्वांसाठीच आव्हानाचा ठरला आहे. २०२० च्या सुरुवातीला सुरु झालेल्या या महामारीने सर्व जगाला एकप्रकारे वेढीस धरलं आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आलीये. त्यामुळे कोरोनाचा धोका टळलेला नाही आणि पुढील काही काळ तो लवकर टळण्याची शक्यता नाही. अशावेळी कोरोना संसर्गपासून वाचण्यासाठी वैयक्तीक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्यात मास्क लावणे, वारंवार हात साबणाने धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

कोरोना महामारीने लोकांच्या जीवनमानावरही प्रभाव टाकला आहे. विशेषत: आपल्या सेक्स लाईफवर कोरोना महामारीने अनेक निर्बंध आणले आहेत. महामारीच्या काळात शारीरिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. पण, सेक्स करताना दोन शरीर जवळ येणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत सेक्स करण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

तसा सेक्स हा विषय आपल्यासाठी जरा अवघडलेला च असतो, सेक्स विषयी उघडपणे बोलणे अजूनही आपल्याकडे समाजात तिरस्कार, संकोचपूर्ण नजरेने पाहिले जाते. किंवा हा विषय जरा बहिष्कृतच आहे म्हणा ना!!! ऐकायला अवघड वाटत असलं तरी “कामेच्छा, शारीरिक आणि भावनिक जवळीकीची नैसर्गिक इच्छा पूर्ण करणं आणि हे करताना कोव्हिड-19 चा फैलाव होणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक आहे

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या पार्टनरबाबत आपल्याला पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. विशेष करुन कॉलेजचे विद्यार्थी किंवा सिंगल असणाऱ्या व्यक्तींसाठी हे खूप महत्त्वाचे आहे. आपला पार्टनर कोण आहे, तो काय करतो, शिवाय तो कोणाच्या संपर्कात आला आहे का, याची माहिती ठेवणे फायद्याचे ठरु शकते. तज्ज्ञांकडून शक्यतो कोरोना काळात सेक्स न करण्याचा सल्ला दिला जातोय. विषाणूला दूर ठेवण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. असे असले तरी सेक्स करणे किंवा रिस्क घेणे वैयक्तिक निर्णय आहे.

सेक्स करतेवेळी दोन्ही पार्टनरला कोरोना संसर्गाविषयी माहिती असणे आवश्यक आहे. शिवाय याबाबत आधी बोलूण घेणे, चर्चा करणे महत्त्वाचे ठरते. कॉलेजचे विद्यार्थी अनेकदा डेटिंग अॅपच्या माध्यमातून पार्टनरशी भेटतात. यावेळी त्यांना पार्टनरची नेमकी ओळख नसते. अनोळखी पार्टनरशी सेक्स केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे कोरोनाकाळात अश्या व्यक्तीशी भेटणे टाळा. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पार्टनरशी संपर्क साधू शकता. किंवा सेक्ससाठी इतर पद्धती वापर करु शकता.

सेक्समधून विषाणूची लागण होते का?
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीचा सलाईव्हा (लाळ), म्युकस (श्लेष्मा) आणि श्वासातून या विषाणूची लागण होऊ शकते. तसंच संक्रमित पृष्ठभागावरूनही संसर्ग होऊ शकतो. एकमेकांचं चुंबन घेण्यामुळे लाळेतून कोरोनाच्या विषाणूची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “तुमच्या तोंडातून तुमच्या हातात, गुप्तांगांत, दुसऱ्या व्यक्तीच्या नाकात किंवा तोंडात कोरोनाचे विषाणू स्पर्श करण्याची शक्यता असल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावते.” आणि म्हणूनच किस न करणे, संभोगावेळीसुद्धा चेहऱ्याला मास्क बांधणे आणि चेहरा समोरासमोर नाही अशा सेक्च्युअल पोझिशन्स घेणे हे अपेक्षित आहे. वीर्य (semen) आणि विष्ठेतही कोरोनाचे विषाणू असतात. त्यामुळे सेक्सवेळी काँडम आणि ओरल सेक्स करतानाही कॉंडमचा वापर करावा. आपण कुठलंही काम करण्यापूर्वी आणि केल्यानतंर 20 सेकंदांपर्यंत हात स्वच्छ धुतो. तसंच संभोगाच्या आधी आणि नंतरही हात स्वच्छ धुवावे. कोरोना काळात सेक्स पुन्हा सुरू करण्यापूर्वी आपल्याला सेक्सश्युली ट्रान्समिटेड इन्फेक्शन झालं आहे का, याची चाचणी करावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group