IPL रद्द! ऑलम्पिक रद्द! मग खेळप्रेमी नक्की करतायत तरी काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#CoronavirusImpact | सध्या कोरोनचं जगभर पसरलेल थैमान पाहता, जागरूकता हे हातात असलेल्या तंत्रज्ञानापेक्षा सर्वात मोठ शस्त्र आहे. अतीआत्मविश्वास आणि बेफिकिरी ह्या दोन गोष्टी या काळात नक्कीच धोकादायक आहेत. एकत्र येण्यातून या विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो हे लक्षात आल्यांनातर जगातील सर्व क्रीडास्पर्धा रद्द करण्यात आल्या. एवढंच काय खेळाची सर्वोच्च स्पर्धा असणारे ऑलम्पिक गेम्स एक वर्षाने पुढे ढकलले गेल्याची अभूतपूर्व घटनाही घडली. भारतात क्रिकेट हा धर्म समजला जातो. हजारो कोटींची उलाढाल असणाऱ्या आयपीएल सारख्या स्पर्धांची भारतातील क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु कोरोनामुळे सर्वच प्रकारच्या क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

साहजिकच भारतीय क्रिकेटच्या असीम चाहत्यांसाठी हे निराश करणारं वातावरण आहे. पण म्हणतात ना जर आयुष्यच राहिलं नाही तर हे सगळं पाहायला मिळणार नाही. त्यामुळे घरी बसूनच अश्या कठीण काळात अनेक गोष्टींमध्ये क्रीडाप्रेमींनी आपला विरंगुळा शोधला आहे. असंख्य गोष्टी आहेत ज्या क्रिकेटप्रेमी किंबहुना क्रीडाप्रेमी करताना पाहायला मिळत आहेत. जसं कि काहीजण त्यांच्या व्हरांड्यात अथवा खोलीतच स्वतःच स्वतः चेंडू, बॅट हातात घेऊन छोट्या जागेत खेळाचा आनंद लुटत आहेत, कोणी दूरचित्रवाणीवर भारत-पाकिस्तान मधील सगळ्या जुन्या विश्वचषकातील सामन्याचा आनंद लुटत आहेत. कोणी युट्यूब वरील त्यांच्या आवडत्या फुटबॉलपटू चे आवडते साईडकिक पाहत आहेत. कोणी तरी अगदी चक्क खेळ बाजूला सोडून रामायण, महाभारत पण पाहत आहेत. कोणी स्वतः सोबत आणि स्वतःसाठी वेळ घालवण पसंद करतय. कोणी घरातच बसून ऑलिम्पिक चे जुने सामने पाहत आहे, कोणी चेस चा सामना रंगवत आहे, कोणी आपल्या परिवारासोबत कॅरम खेळणं पसंत करत आहे. कोणी काहीच नाही झालं तर आपल्या आवडत्या जुन्या खेळाडूंचे गाजलेले सामने पाहत आहे.

सोबतीला नेटफलिक्स, अमेझॉन प्राईम आदी प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. इकडे खेळाशी संबंधित चित्रपटांचा खजाना उपलब्ध आहे. ते पाहण्यात पण अनेक जण मन रमवत आहेत. अशा कठीण प्रसंगी, खेळ आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात करुणा, भावना, प्रेम, आवड, चिकाटी, धैर्य आणि अशा सर्व काही गोष्टी शिकवतोे ज्या आपल्या आयुष्याच्या अश्या कठीण प्रसंगात नक्की कामाला येतात. अश्या अवघड प्रसंगी जे कोणी खेळप्रेमी त्यांचा आवडत खेळ पाहू शकत नाहीत किंवा खेळू शकत नाहीयेत त्यांना एवढचं म्हणेन की, तुमच्या आमच्यातला हा खेळाडूपणा असाच कायम ठेवा, प्रसंग आणि वेळ कठीण आहेत पण पार करता येणार नाहीत अशे अजिबातच नाहीत. तेव्हा लवकरच हे सगळं थांबेल अशी इच्छा बाळगुया तोपर्यंत असच हसत राहा, खेळत राहा, आणि खिलाडू वृत्ती कायम ठेवा. “क्यूंकि वो भी एक दौर था, ये भी एक दौर है, थम जायेगा, गुजर जायेगा, और नया दौर जरूर आयेगा. तबतक उम्मीद कायम रहें” कारण खेळ असो किंवा दैनंदिन आयुष्य, उम्मीद पे दुनिया कायम हैं.

पवन बिलापट्टे
8208314957
(लेखक क्रिकेट आणि टेनिस या दोन खेळांचा असीम चाहता आहे, व्यवसायाने इंजिनियर आहे)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा