गणेश विसर्जनानंतर पूजेचे तांदूळ, वस्त्र, श्रीफळ यांचे नेमके काय करावे?,आत्ताच घ्या जाणून

Ganesh Chaturthi 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturthi 2023) आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांना अगदी थाटामाटात विसर्जन केले जाते. गणेश भक्त दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा अर्चना आराधना करत असतात परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला अगदी जड अंतकरणाने निरोप द्यावा लागतो. दहा दिवस अगदी घरातल्या सदस्याप्रमाणेच आपण गणपती बाप्पाची काळजी घेत असतो. गणपती बाप्पाचे वेगवेगळे पदार्थांच्या माध्यमातून लाड पुरवत असतो. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरामध्ये पाहुण्यांची रेल चेल देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. घरातील सारे सदस्य एकत्र येतात. घराला घरपण येत असते परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या जाण्याने घरातील सदस्य देखील हळूहळू कमी होऊ लागतात. घरात घरपण येऊ लागते आणि एका वर्षाने घरामध्ये आलेले आनंद पण काही क्षणातच निघून जाते.

गणपती बाप्पाची पूजा अर्चना आराधना करत असताना आपण अनेक वस्तूंची यांचा वापर करत असतो, यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, श्रीफळ, गणपती बाप्पाचे वस्त्र यांचे विसर्जनानंतर काय करावे याबद्दल अनेकांना माहिती नसते. जर आपण त्यांची योग्य काळजी घेतली नाही तर आपल्याला गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ शकत नाही म्हणूनच गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व वापरलेल्या वस्तूंचा अपमान होणार नाही या अनुषंगाने देखील आपल्याला विचार करणे गरजेचे आहे.

गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर आपण गणपती बाप्पाचे जे वस्त्र असते त्याचा उपयोग करू शकतो. हे वस्त्र आपण घरातील देवपूजा करण्यासाठी वापरू शकतो तसेच देवघरातील साहित्य पुसण्यासाठी देखील वापरू शकतो. आपण आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी बाप्पा बसवलेला असतो, त्या ठिकाणी आपण विविध पूजा करत असतो. गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर तुम्ही नदीमध्ये, तलावामध्ये विसर्जित कराल तेव्हा त्या ठिकाणावरून थोडीशी माती आपल्या घरी आणा आणि ज्या ठिकाणी बाप्पा बसलेले होते त्या ठिकाणी ही माती ठेवा. गणपती बाप्पाचे जरी विसर्जन झाले असले तरी गणपती बाप्पा सूक्ष्म देहाने त्या ठिकाणी वास्तव्य करत असतात, असे म्हटले जाते आणि म्हणूनच घरी आल्यावर त्या मातीची आपल्याला अवश्य आरती करायची आहे. तुम्ही ती माती देवघरात ठेवून नेहमी आपल्या कपाळाला देखील लावू शकता असे केल्याने बाप्पाचे शुभ आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. आपण पूजेसाठी जो कलश मांडलेला असेल त्या कलेचा खाली जे तांदूळ असतात ते तांदूळ तुम्ही तुमच्या घरातील अन्य धान्यांमध्ये मिसळून घरामध्ये वापरू शकता किंवा त्या तांदळाची खीर देखील बनवू शकता. हे तांदूळ घरामध्ये असणाऱ्या धान्यांमध्ये मिसळल्याने घरामध्ये बरकत राहते, असे देखील म्हटले जाते.

जर तुम्हाला हे तांदूळ घरात वापरायचे नसेल तर तुम्ही पक्षांना देखील खाऊ घालू शकता त्यानंतर जे सुपारी आणि हळद हळकुंड आहेत ते तुम्ही बागेमध्ये एक खड्डा करून त्यात करू शकता यामुळे झाडे देखील उगवतील. सुपारीच्या झाडांचा सजावटीसाठी चांगला उपयोग केला जातो त्यानंतर कलशामध्ये असलेली दक्षिणा तुम्ही कन्येला देऊ शकता. जर तुमच्या घरामध्ये मुलगी नसेल तर तुम्ही बाहेरील कोणत्याही मुलीला दक्षिणा देऊ शकता तसेच कलशातील पाणी झाडांना वाहू शकता. असे केल्याने तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा सूक्ष्म स्वरूपाने राहतील. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊन तुम्हाला बापाचा आशीर्वाद देखील मिळेल, अशा प्रकारे गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये वापरलेल्या वस्तूंचा तुम्ही सदुपयोग करून बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी प्राप्त करू शकतात.