हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारातील विक्रीचा टप्पा सुरूच आहे. सेन्सेक्स उचांकवरून 10,000 अंकांनी घसरला आहे. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये 5 टक्क्यांहून अधिकने घसरण झाली. सध्याच्या वातावरणात मंदी येण्याची चिन्हे दिसून येत आहेत, अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय बाजारही यापासून सुटू शकलेला नाही.
17 जून रोजी संपलेल्या ट्रेडिंग वीकमध्ये सेन्सेक्स 5.41 टक्क्यांनी घसरून 51,360 वर बंद झाला. तर निफ्टी 5.6 टक्क्यांनी घसरून 15,293 वर बंद झाला. लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्स बरोबरच मिड आणि स्मॉल कॅप्सवरही विक्रीचा दबाव राहिला. Share Market
पुढील आठवड्यात बाजाराची वाटचाल कशी असू शकेल ???
मनीकंट्रोलमधील आपल्या एका आर्टिकल मध्ये कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले यांनी सांगितले की,” निफ्टीवरील ट्रेडर्ससाठी 15,400 पॉइंटची पातळी निर्णायक ठरेल. जर बाजार या पातळीच्या वर गेला तर तो 15,600-15,700 पर्यंत जाऊ शकेल. मात्र त्याच वेळी जर त्याने तो रोल केला तर तो 15,200 वर जाईल. आठवले पुढे म्हणतात की, जर बाजारात विक्री पुन्हा सुरू राहिली तर ती 15,000 पर्यंत देखील खाली येऊ शकेल. यामुळे बँकिंग क्षेत्रातही जोरदार घसरण होण्याची शक्यता आहे.” Share Market
चीनचा व्याजदर आणि US Fed वर बाजाराचा कल
रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणतात की,” देशांतर्गत बाजारात आता जागतिक ट्रिगर्सबाबत अस्थिरता दिसून येत आहे.” ते पुढे म्हणतात की,” यूएस फेडच्या अध्यक्षांच्या भाषणावर आणि चीनच्या व्याजदरांबाबत करण्यात येणार्या घोषणेवर बाजाराचा कल हलताना दिसून येतो आहे”.ते पुढे म्हणतात की,” सध्या बाजाराबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन नकारात्मक आहे.” Share Market
बँकिंग इंडेक्समध्ये घसरण आहे
तसेच सॅमको सिक्युरिटीजच्या येशा शाह सांगतात की,” S&P 500 आणि देशांतर्गत बँकिंग इंडेक्स तांत्रिकदृष्ट्या बिअर मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. ज्यामुळे बाजारात आणखी पडझड होण्याची भीती कायम आहे. आता डॉलर इंडेक्स, कोविड-19 आणि कच्च्या तेलाची किंमत अशा काही घटकांवर बाजाराची हालचाल अवलंबून असेल.” Share Market
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nse.com
हे पण वाचा :
Airtel ने ग्राहकांना दिला धक्का ! आता पोस्टपेड प्लॅन 200 रुपयांनी महागले
Aadhaar Card Update : मोबाईल नंबरशिवाय PVC आधार कार्ड कसे तयार करावे हे जाणून घ्या
PAN Card ऑनलाइन व्हेरिफाय करण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
EPF account मध्ये आपले बँक डिटेल्स कसे अपडेट करायचे ते समजून घ्या
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा दरमहा 5000 रुपये !!! कसे ते जाणून घ्या