तुमचे #Citibank मध्ये खाते आहे का? बँक भारतातून होणार Logout, जाणून घ्या कर्मचारी आणि खातेदारांचे काय होणार?

नवी दिल्ली : अमेरिकेचा बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा गट सिटी ग्रुप (सिटी ग्रुप) भारतातून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. गुरुवारी सिटी बँकेने सांगितले की, ‘ते भारतात ग्राहक बँकिंग व्यवसाय बंद करणार आहेत . हा त्यांच्या जागतिक रणनीतीचा एक भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे’. बँकेच्या ग्राहक बँकिंग व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे. कंपनीने आता केवळ 4 मार्केटवर लक्ष केंद्रित केले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हा बाजार हाँगकाँग, लंडन, सिंगापूर आणि युएई असेल.

एकूण ग्राहकांची संख्या सुमारे 29 लाख

सिटीबँकच्या देशात 35 शाखा आहेत आणि ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे 4,000 लोक काम करतात. भारतातील सिटीबँकच्या एकूण ग्राहकांबद्दल बोलायचे झाले तर ही संख्या सुमारे 29 लाख आहे. या बँकेत 12 लाख खाती आहेत आणि एकूण 22 लाख ग्राहकांकडे सिटी बँकेचे क्रेडिट कार्ड आहे.

खातेदारांचे काय होईल

सिटी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशु खुल्लर म्हणाले की, आमच्या कामांमध्ये त्वरित बदल झालेला नाही आणि या घोषणेचा आमच्या सहकाऱ्यांवर तातडीने परिणाम होणार नाही. आम्ही आमच्या ग्राहकांच्या सेवेत कोणतीही कमतरता ठेवणार नाही. ते म्हणाले की या घोषणेमुळे बँकेच्या सेवा आणखी मजबूत करण्यात येतील. संस्थात्मक बँकिंग व्यवसायाव्यतिरिक्त सिटी मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम केंद्रांमधून जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रित करेल.

1985 मध्ये त्यांनी ग्राहक बँकिंग क्षेत्रात केला होता प्रवेश

1902 मध्ये सिटी बँकने भारतात प्रवेश केला आणि 1985 मध्ये बँकेने ग्राहक बँकिंग व्यवसाय सुरू केला. संस्थात्मक बँकिंग व्यवसायाव्यतिरिक्त सिटी मुंबई, पुणे, बंगळुरू, चेन्नई आणि गुरुग्राम केंद्रांमधून जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रित करत राहील. 2019-20 या आर्थिक वर्षात सिटी बँकेचा निव्वळ नफा 4912 कोटी होता, मागील आर्थिक वर्षातील 4185कोटी रुपये होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like