घराबाहेर पडताल तर खाजगी रुग्णालयात भरती करण्यात येईल: आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई | सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये करोणाचे रुग्ण संपूर्ण कॅपॅसिटीने भरले आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड मिळत नाही. यासाठी काही रुग्णांना होम आयसोलेशन म्हणजे गृह विलागिकरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण ते रुग्ण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे इतर लोकांना करोना होण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियम पाळले नाही तर त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागेल. तसेच त्यांचा खर्चही त्यांना स्वतःलाच करावा लागेल. असा इशारा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी दिला.

यासोबतच, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला राज्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवा, तसेच वातावरणातून ऑक्सीजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खाजगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना ते बंधनकारक करा, पॉझिटिव्ह रुग्णांना ग्रह-आलगीकरणा ऐवजी त्यांना संस्थात्मक विलगीकरणावर भर द्या. तसेच, जिल्ह्यामध्ये rt-pcr चाचण्यांचे प्रमाण वाढवा. असे निर्देश दिले.

वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात असे यंत्र बसवण्यासाठी प्रयत्न करावेत. सक्रिय रुग्ण संख्या पाहून खाजगी रुग्णालयांना रिमदेसिविर इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार असून त्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉक्टर राजेश शिंगणे यांच्या समवेत बैठक झाली आहे. राज्य कृती दलाने करोणा रुग्णांच्या उपचारासाठी जो प्रोटोकॉल तयार केला आहे. त्याचे पालन करण्याचे निर्देश प्रधान सचिव डॉक्टर व्यास यांनी दिले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like