हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग अॅप Whatsapp ने एकाच वेळी 36 लाखांहून अधिक भारतीयांचे अकाउंट्स बॅन केली आहेत. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या काळात हे सर्व अकाउंट्स बंद करण्यात आली आहेत. युजर्सच्या तक्रारीच्या आधारे ही खाती बॅन करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन, यूजर्सचा रिपोर्ट आणि इतर कारणांमुळे WhatsApp दर महिन्याला अनेक अकाउंट्स बॅन करते.
कंपनीचे म्हणणे आहे की 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान 3,677,000 व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन करण्यात आले आहेत. यापैकी 13.89 लाख खाती भारतीय यूजर्सच्या तक्रारींच्या आधारे बॅन करण्यात आली आहेत. 2021 मध्ये नवीन IT नियम आल्यानंतर, मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मना दर महिन्याला कंप्लायंस रिपोर्ट जारी करावा लागेल. या रिपोर्ट मध्ये , सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म सुरक्षित करण्यासाठी त्यांनी केलेल्या सर्व कृतींची माहिती देतात.
विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान 37 लाखांहून अधिक भारतीय अकाउंट बॅन करण्यात आली होती. युजर्सच्या तक्रारीच्या आधारे ही खाती बॅन करण्यात आली आहेत. यापैकी 10 लाख खाती अशी होती जी भारतीय वापरकर्त्यांनी फ्लॅग केली होती.