मुंबई । सुशांत प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावं समोर येत आहेत. NCBने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेकांना ताब्यात घेतलं आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, ड्रग्जबाबत अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. या खुलाशांचा आधार कथित जुने Whatsapp चॅट आहेत. या प्रकरणाच्या तपासात ड्रग्ज चॅट समोर आल्यानंतर NCBने श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि दीपिका पदुकोण यांना समन्स पाठवला. दरम्यान, ज्या कथित Whatsapp चॅटच्या आधारावर दीपिकाची NCBकडून चौकशी होत आहे ते चॅट 2017 मधलं आहे. दरम्यान, दीपिकाने हे कथित ड्रग्ज चॅट डिलीट केल्यानंतरही, काही वर्षांपूर्वीचं चॅट आता NCBकडे कसं आलं? असा सवाल आता सगळ्यांना पडला आहे. त्यावर आता Whatsappने स्पष्टीकरण दिलं आहे.
Whatsappने दावा केला आहे की, त्यांचे सर्व चॅट एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन (End to end Encrypted) असतात. याचा अर्थ हे चॅट केवळ पाठवणारा आणि ज्याला पाठवलं तो वाचू शकतो. व्हॉट्सऍपही हे चॅट वाचू शकत नाही कारण चॅट कोणत्याही सर्व्हरवर सेव्ह होत नाही. परंतु सुशांतच्या मृत्यूप्रकरणी चौकशीदरम्यान लीक झालेल्या अनेक चॅटमुळे कंपनीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन Whatsappच्या सर्व चॅटला प्रोटेक्ट करते. सेंडर आणि रिसिव्हरशिवाय चॅट्स कोणी वाचू शकत नाही. Whatsappवर फोन नंबरद्वारे लॉगइन केलं जातं. त्यामुळे कंपनीही मेसेज कंटेंट एक्सिस करु शकत नाही. कंपनी Operating System Manufacturers च्या संपूर्ण गाईडलाईन्स पाळतात. त्यामुळे केवळ फोन डिव्हाईसवर चॅट सेव्ह होऊ शकतात.
सुशांत राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया साहाद्वारे दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्माचं चॅट एनसीबीच्या हाती लागलं असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयाने तिच्या Whatsapp चॅटचा बॅकअप Google Drive किंवा iCloud वर घेतला होता. कोणताही बॅकअप प्लॅटफॉर्म, Whatsappच्या एन्ड टू एन्ड इंक्रिप्शन पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही. अशात जर कोणत्याही तपास यंत्रणेने एखाद्या संशयिताच्या फोनचा डेटा दुसऱ्या कोणत्याही डिव्हाईसवर कॉपी केल्यास, फोन क्लोनिंगचा वापर होतो. ज्याद्वारे Backed up Chats सहजपणे वाचले जाऊ शकतात. Law enforcement agencies आणि बॉलिवूड कलाकारांच्या लीक चॅटसोबत अशाच प्रकारची बाब झाल्याचं समजतं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.