WhatsApp Feature । व्हॉट्सॲप आता माणसाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनला आहे. आज कोणताही वैयक्तिक वा सामाजिक संदेश पाठवायचा म्हटले तर व्हॉट्सॲप गरजेचा झालाय. जगामध्ये मोठ्या प्रमाणात मॅसेज पाठवण्यासाठी या मॅसेजिंग ॲपचा जास्त वापर होतो. व्हॉट्सॲपवर काय करता येत नाही ? व्हिडीओ – ऑडीओ कॉलिंग, क्षणार्धात पैसे ट्रान्स्फर करणे या सुविधा व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहेत. आताही कंपनी अजून एक महत्वाचे फीचर्स लाँच करणार आहे, त्या माध्यमातून तुमचा मोबाईल क्रमांक न दिसता तुम्ही बिनधास्त पणे कोणाशीही चॅटिंग करू शकता.
काही वेळेला कामानिमित्त अनेक लोकांशी चॅटिंग करावे लागते, परंतु काम संपल्यानंतर अशा व्यक्तींचा संपर्कही होत नाही. व्हॉट्सॲपवर अनोळखी लोकांशी संवाद साधण्याची अडचण अनेकजणांना येते. आपला मोबाईल क्रमांक अनोळखी व्यक्तीला शेअर करण्यात आपल्याला सुरक्षितता वाटत नाही. त्यासाठी व्हॉट्सॲप खास फीचर आणत आहे. या फिचरचा नेमका आपल्याला काय फायदा होणार, या फिचरमध्ये आणखी काही असणार हे आपण पाहणार आहोत.
नवीन फीचरवर सुरु आहे काम- WhatsApp Feature
बिझनेस टुडेमध्ये व्हॉट्सॲपच्या नवीन फिचरबद्दल एक अहवाल देण्यात आला आहे. WA Beta Info ने केलेल्या दाव्यानुसार ही माहिती दिली आहे. त्यानुसार, मोबाईल क्रमांक शेअर न करताही तुम्ही अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधू शकणार आहेत. व्हॉट्सॲपचे या नवीन फीचरवर (WhatsApp Feature) काम सुरु आहे. ते काम झाल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक न दिसता , अनोळखी व्यक्तीशी तुम्ही सहजपणे चॅटिंग करू शकता.
मोबाईल क्रमांक नव्हे, युझरनेम दिसणार
सदर अहवालानुसार, व्हॉट्सॲपचे युझर्स लवकरच या फीचरचा (WhatsApp Feature) वापर करु शकणार आहेत. या नव्या फीचरचा वापर करुन युझर एक युनिक युझरनेम तयार करतील. त्यामुळे नावाची ओळख लपवून युझर दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधू शकतो. त्यावेळी आपला मोबाईल क्रमांक दुसऱ्याला दिसू शकणार नाही. ॲड्राईड आणि वेबच्या युझर्ससाठी ही नवीन सुविधा प्राप्त होणार आहे. डब्ल्यूए बीटा इंफो नुसार, युझरच्या नावाने व्हॉट्सॲपवर सर्च करता येण्याची सोय आहे. सर्च बार वर जाऊन युझरचे नाव टाईप केले की बिनधास्त तुम्ही दुसऱ्या युझरशी चॅटिंग करू शकता. त्यामुळे युझरची वैयक्तिक माहिती उघड होण्याची शक्यता नाही.
सध्या व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरची चाचपणी सुरु असल्याचे म्हटले जात आहे. व्हॉट्सॲपची मुळ कंपनी मेटाने या फीचरविषयी अधिकृतरीत्या बातमी जाहीर केलेली नाही. सद्यस्थितीत बीटा युझर्सच्या काही ग्रुपवर या फीचरची चाचणी सुरु करण्यात आली आहे. त्यातील काही अडचणी दूर करून हे फीचर युझर्ससाठी वापरात येईल. या फीचरच्या वापरामुळे युझर युनिक युझरनेम तयार करून व आपली खरी ओळख लपवेल आणि अनोळखी इतर व्यक्तींशी संवाद साधणार आहे. व्हॉट्सॲपच्या या नव्या फिचारामुळे अनेक अडचणी दूर होणार आहेत.