WhatsApp Feature : प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअँपचे जगभरात करोडो यूजर्स आहेत. यापूर्वी आपण WhatsApp वर फक्त चॅटिंग आणि एकेमेकांना फोटो विडिओ शेअर करत होतो. परंतु आता बदलत्या युगानुसार WhatsApp सुद्धा अपडेटेड झालं आहे. आता आपण WhatsApp वरून आपली पर्सनली किंवा ऑफिशिअल कामे आरामात करू शकतो. तसेच एकमेकाना पैसेही पाठवू शकतो. व्हाट्सअप सुद्धा आपल्या युजर्सला चांगला अनुभव यावा यासाठी सातत्याने नवनवीन फीचर्स ऍड करत असते. आताही कंपनीने अँप मध्ये एक नवीन फिचर आणलं आहे. या फीचरमुळे तुम्हाला येणार स्पॅम कॉल एका झटक्यात तुम्ही ब्लॉक करू शकता.
स्पॅम मेसेज किंवा कॉल्समुळे (Spam Call) आपण सतत त्रस्त होतो. यावर मात करण्यासाठी आपल्याला सेटिंग मध्ये जाऊन सदर नंबर ब्लॉक करावा लागतो. मात्र व्हाट्सअपच्या या नव्या फीचरमुळे युजरला ॲपवर जाण्याची गरज भासणार नाही. यूजर्सला स्पॅम मेसेज ओळखण्याची आणि ब्लॉक करण्याची परवानगी या फीचर्समुळे मिळतेय. आणि तुम्ही एका क्लीकवर सदर स्पॅम कॉल किंवा मेसेज ब्लॉक करू शकता.
कसं काम करत हे फीचर्स – WhatsApp Feature
जेव्हा जेव्हा लॉक स्क्रीनवर स्पॅम मेसेजची नोटिफिकेशन दिसते तेव्हा युजर्सला त्या नोटिफिकेशन वर बोटाने लांब प्रेस करावं ;लागेल. त्यानंतर अनेक पर्याय तुमच्यासमोर येतील. त्यापैकी पाठवणाऱ्याला त्वरित ब्लॉक करणे या पर्यायावर क्लीक करावे लागेल. ब्लॉक केल्यानंतर, व्हाट्सअप आणखी एक प्रॉम्प्ट देखील दाखवेल ज्यामध्ये ब्लॉक केलेल्या सेंडरची तक्रार देखील केली जाऊ शकते.
दरम्यान, WhatsApp वर लवकरच आणखी एक फीचर (WhatsApp Feature) येणार आहे ज्यामध्ये इतर प्लॅटफॉर्मवर देखील मेसेज पाठवता येतील. म्हणजेच सोप्प्या भाषेत सांगायचं झाल्यास, समजा, एखाद्याला तुम्हाला इन्स्टाग्रामवर मेसेज करायचा असेल तर तो मेसेज व्हॉट्सॲपवरही मिळू शकतो. यासाठी थर्ड पार्टी चॅट्सचा विभाग लवकरच ॲपमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये इतर प्लॅटफॉर्मवरील मेसेज तुम्हाला दाखवले जातील.