हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग App असलेले WhatsApp खूपच लोकप्रिय आहे. याबरोबरच कंपनीकडून यामध्ये सतत नवनवीन फीचर्स दिले जात असल्याने त्याच्या लोकप्रियतेत आणखीच भर पडते आहे. तसेच युझर्सची सोय लक्षात घेऊन या App मध्ये विविध नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. दरम्यान, WhatsApp कडून आणखी एक नवीन फीचर लाँच केले जाणार आहे, ज्याद्वारे युझर्सना पाठवलेले मेसेजेस एडिट करता येतील.
सध्या WhatsApp कडून एका जबरदस्त फीचरवर काम केले जात आहे ज्यामध्ये युझर्सना पाठवलेले मेसेज एडिट करता येतील. WABetaInfo कडून नुकतेच याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सांगितले कि, WhatsApp एका मेसेज एडिटिंग फीचरवर काम करत आहे, ज्याला Edit Message असे नाव दिले जाऊ शकते. यामुळे जेव्हा घाईगडबडीत चुकीचा मेसेज टाईप करून पाठवला जातो तेव्हा हे फीचर अतिशय उपयुक्त ठरेल.
WB ने सांगितले की, हे फीचर सध्या डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे, म्हणजेच त्यावर अजूनही काम केले जात आहे. हे फीचर बीटा अँड्रॉइड 2.22.20.12 अपडेटमध्ये दिसले आहे.
असे मानले जाते की ते येत्या अपडेट्ससह रोल आउट केले जाईल. मात्र हे फिचर सर्वांत आधी बीटा टेस्टर्ससाठी लाँच केले जाईल.
मात्र सध्या हे फीचर कसे काम करणार याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र असे मानले जाते आहे कि, एडिट केलेल्या मेसेजसमोर ‘Edit’ असे लेबल दिसू शकते. तसेच, मेसेज पाठविल्याची काही वेळानंतरच पाठवलेला मेसेज एडिट करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.whatsapp.com/
हे पण वाचा :
टाटा ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल
Kotak Mahindra Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा
HSBC Bank ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर तपासा
SBI कडून ‘या’ स्पेशल FD च्या गुंतवणूकीची शेवटची तारीख वाढवण्यात आली
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन