हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वीच WhatsApp कडून iOS बीटा iOS 22.18.0.70 साठी एक अपडेट सादर करण्यात आले आहे, ज्याद्वारे चॅट लिस्ट मधूनच स्टेट्स अपडेट पाहया येईल. आता WhatsApp iOS बीटासाठी Undo फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे चुकून डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करता येईल. काही दिवसांपूर्वीच अँड्रॉइड बीटा साठी हे फीचर जाहीर करण्यात आले होते. हे फीचर WhatsApp बीटा अँड्रॉइड 2.22.13.5 अपडेटमध्ये आले आहे, जेणेकरून चुकून डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करता येतील.
WABetaInfo ने जारी केलेल्या रिपोर्ट्स नुसार यासाठी युझर्सना फक्त काही सेकंदच मिळतील. तसेच, हे फक्त वन-इन-वन चॅटमध्ये ‘delete for me’ साठी काम करेल. हे ‘delete for everyone’ साठी वापरता येणार नाही.
आता स्टेट्स पाहण्याची पद्धत देखील बदलणार… WhatsApp एक अशा फीचरवर काम करत आहे ज्यामुळे युझर्सना लोकांचे स्टेट्स सहजपणे पाहता येतील. WhatsApp च्या या फीचरमुळे युझर्सना चॅट लिस्टमध्येच स्टेट्स पाहता येतील अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे. त्याच बरोबर त्यांनी असे देखील सांगितले की हे फीचर सध्या अँड्रॉईड बीटा टेस्टर्ससाठी सादर करण्यात आले आहे.
WABetaInfo ने याबाबत पुढे सांगितले की, या आधी एखाद्याचे स्टेट्स पाहण्यासाठी आपल्याला स्टेट्स सेक्शन मध्ये जावे लागायचे, मात्र आता युझर्सना त्यांच्या चॅटमध्येच त्या कॉन्टॅक्टचे स्टेट्स दिसेल. WABetaInfo ने आपल्या पोस्टसह एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, जो दर्शवितो की हे फिचर इंस्टाग्रामच्या स्टोरीसारखेच दिसते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.whatsapp.com/
हे पण वाचा :
“UPI सर्व्हिससाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही”- अर्थ मंत्रालय
Sovereign Gold Bond द्वारे आजपासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी !!!
Bandhan Bank च्या बचत खाते अन् FD वरील व्याजदरात वाढ !!!
3 महिन्यांसाठी YouTube Premium फ्री मध्ये मिळवण्याची संधी !!!
Bank FD : आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा !!!