Whatsapp साठी आता मोजावे लागणार पैसे; 1 जूनपासून ‘इतका’ चार्ज पडणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या देशातील 90 टक्के जनता मोबाईलचा वापर करते. मोबाईल वरून सोशल मिडियाचा वापर तर सर्रास सुरु असतो. सोशल मीडियावरील फेसबुक व्हाट्सअप, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मची भुरळ तरुण मुलांसापासून वृद्धांपर्यंत सर्वानाच असते. परंतु आता व्हाट्सअप वापरणाऱ्या यूजर्ससाठी थोडी वाईट बातमी आहे. याचे कारण १ जूनपासून व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन वापरणाऱ्यांना पैसे भरावे लागणार आहेत.

किती चार्ज पडणार ?

व्हॉट्सअॅपवर कमाई करण्यासाठी मेटाने एक मसुदा तयार केला आहे. त्यानुसार, व्हॉट्सअॅपने युटिलिटी, ऑथेंटिकेशन यासारख्या तीन प्रकारच्या बिजनेस इन्शिएटिव कॅटेगरी सुरू केल्या आहेत. कॅटेगरी नुसार, त्याचा चार्ज ठेवण्यात आलाय. 1 जून 2023 पासून यासाठी शुल्क लागू केले जाईल. माहितीनुसार, सध्या WhatsApp Business च्या प्रत्येक संभाषणासाठी 0.48 रुपये आकारले जातात. जे 1 जूनपासून 0.3082 रुपये केले जाईल. मार्केटिंग मेसेज साठी प्रति संभाषण 0.7265 रुपये आकारले जातील. याशिवाय, प्रति मेसेज अथेंटिकेशन साठी किंमत दर नंतर ठरवले जातील.

WhatsApp Business अकाउंट हे सामान्य व्हाट्स अँप अकाउंटपेक्षा निराळे आहेत. ह्या अकाउंटमध्ये वेगवेगळे फीचर्स असतात. ह्यातील प्रमोशन मॅसेजद्वारे तुम्ही दुसऱ्यांच्या प्रमोशन स्टोरीसोबत तुमचीही प्रमोशन स्टोरी जोडू शकता. त्यासाठी ठराविक रक्कम आकारली जाते . त्याच रक्कमेत आता वाढ करण्यात आली आहे. दिलासादायक म्हणजे सर्वसामान्य व्हाट्स अँप वापरकर्त्यांना कोणत्याही प्रकारचे चार्जेस भरावे लागणार नाही . त्यामुळे सर्वसामान्य व्हाट्स अँप यूजर्सनी घाबरण्याचे कारण नाही.